Five Children Death Bihar Aurangabad News Saamtv
देश विदेश

Bihar News: राखी बांधून घराबाहेर पडले, परतलेच नाहीत... तलावात बुडून ५ मुलांचा मृत्यू; गावावर शोककळा

Five Children Death Bihar Aurangabad News: पाचही मुले राखी बांधून झाल्यानंतर पोहायला गेली असता ही ह्रदयद्रावक घटना घडली.

Gangappa Pujari

Bihar News: बिहारच्या औरंगाबाद जिल्ह्यातून एक काळीज पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. रक्षाबंधन करुन पोहायला गेलेल्या पाच भावंडाचा दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना सोनारचक गावात उघडकीस आली. ही पाचही मुले राखी बांधून झाल्यानंतर पोहायला गेली असता ही ह्रदयद्रावक घटना घडली. या घटनेने संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, बिहारच्या (Bihar) औरंगाबाद (Aurangabad) जिल्ह्यातील सोनारचक गावामध्ये राखी पोर्णिमेच्या सणादिवशीच दुर्देवी घटना घडली. गावातील पाच मुले रक्षाबंधन करुन गावाशेजारच्या एका डोहात पोहायला गेली होती. यावेळी त्यांना पाण्याचा अंदाज न आल्याने पाचही जण पाण्यात बुडाले.

परिसरातील गुरे चारणाऱ्या लोकांना मुलांची कपडे दिसल्याने संशय आला. ज्यानंतर हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला. मुलांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचाराआधीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.

गावातील अनुज यादव यांचा मुलगा शुभम उर्फ ​​गोलू कुमार (वय, 11), नीरज कुमार (2 वर्ष), धीरज कुमार (वय, १० वर्ष), प्रिन्स कुमार (वय, १२), अमित कुमार (वय, १२) आणि अमित कुमार अशी मृत मुलांची नावे आहेत. या घटनेने संपूर्ण गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले. मृतांच्या नातेवाईकांनी प्रशासनाविरोधात संताप व्यक्त करत आक्रमक भूमिका घेतल्याने पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांची तब्येत खालवली; तातडीनं रुग्णालयात दाखल

विधानपरिषद निवडणुकीत शिंदेसेना-भाजप आमनेसामने; महायुतीतला वाद चव्हाट्यावर

रामलीला मैदानावर रावणासोबत झुरळही जाळणार; स्वच्छ भारत अभियानाचा दावा की राजकीय निशाणा?

CJPच्या आंदोलनाआधीच दिपके पोलिसांच्या ताब्यात; दिल्लीत पुन्हा एकदा हायव्होल्टेज ड्रामा

तिकीट तपासणीवरून महिला प्रवासीचा टीसीसोबत वाद; कांदिवली स्टेशनवर नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT