Panvel Crime Saam Tv
देश विदेश

Crime : बायकोनं दीरासोबत संसार थाटला, नवऱ्याची सटकली; घरात घुसून सासूची केली हत्या

Bihar crime husband kills mother-in-law : बिहारच्या भागलपूर जिल्ह्यात धक्कादायक घटना घडली आहे. बायकोनं घटस्फोट घेऊन दीरासोबत लग्न केल्यामुळे संतप्त पतीनं सासूची चाकूने भोसकून हत्या केली. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली असून आरोपी फरार आहे.

Namdeo Kumbhar

पाच वर्षे लग्नाला झाल्यानतर बायकोने घटस्फोट घेऊन दीरासोबत लग्न करून संसार थाटल्यामुळे नवऱ्याला राग अनावर झाला. संतापलेल्या नवऱ्याने घरात घुसून सासूची निर्घृण हत्या केली. बिहारमधील भागलपूर जिल्ह्यात नाथनगरमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. मृतक महिलेचे नाव बीबी कौशर असे आहे. या हत्याकांडानंतर बिहारमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

बायकोने सोडल्यामुळे संतापलेल्या जावयाने सासुरवाडीमध्ये जाऊन सासूची हत्या केली. मधुसूदनपूरमध्ये घराबाहेर पटांगणात झोपलेल्या बीबी कौशर यांची मध्यरात्री चाकूने भोसकून हत्या केली. मृत बीबी कौशर यांना पाच मुली अन् एक मुलगा आहे. बीबी कौशर यांच्या हत्येनंतर गावात एकच खळबळ उडाली. मृत महिलेच्या पत्नीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांकडून आरोपीचा शोध घेतला जात आहे. सासूची हत्या केल्यानंतर जावई फरार आहे.

मृत महिलेच्या मुलही शबनमने सांगितले की, गुरूवारी रात्री जेवण झाल्यानंतर सर्वजण झोपण्यासाठी गेले. घराच्या बाहेरच्या पटांगणात आई विश्रांती घेत होती. रात्री दीड ते दोन वाजण्याच्या आसपास तिचा पहिला नवरा आपताफ आला. त्याच्या हातत चाकू होता. त्याने बीबी कौशर यांच्या पोटात, छातीवर अन् गळ्यावर सपासप वार केले अन् पसार झाला. चाकू लागल्यामुळे बीबी कौशर यांच्या पोटातून रक्त मोठ्या प्रमाणात वाहत होते. तिला बेशुद्ध अवस्थेत रूग्णालयात दाखल करण्यात आले. पण उपचाराआधीच तिचा मृत्यू झाला.

शबनम आणि मोहम्मद आफताब यांचे पाच वर्षांपूर्वी लग्न झाले होते. मोहम्मद आफताब दारू पिऊन शबनमला सारखा त्रास द्यायचा, मारहाण करायचा. हुंड्यासाठी वांरवार छळ करत होता. पंचायतमध्येही याबाबत तक्रार दाखल केली. पंयायतमध्ये त्याला समजावण्यात आले, पण सुधारणा झाली आहे. घरात खर्चाला पैसेही देत नव्हता. त्यामुळे शबनम आईकडे येऊन राहत होती. तिने मोहम्मदला घटस्फोट दिला होता. सहा महिन्यापूर्वी शबनम हिने मोहम्मदचा छोटा फाऊ इम्तियाज याच्यासोबत लग्न केले. यामुळे मोहम्मदचा राग अनावर गेला. त्याने सासूला जिवे मारण्याची धमकी दिली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मराठी-हिंदी संघर्ष, मुस्लीम ठरणार किंगमेकर? मुंबईची निवडणूक पुन्हा भाषा आणि प्रांतावर

Maharashtra Live News Update : बाळासाहेब आणि उद्धव ठाकरेंशी गद्दारी म्हणजे आपल्या आईच्या दुधाशी बेईमानी : आमदार नितीन देशमुख

Maharashtra Politics: एकनाथ शिंदेंनी लातूरमध्ये टाकला मोठा डाव, 17 अपक्ष उमेदवारांचा शिवसेनेत प्रवेश

चालत्या फिरत्या माणसाला हृदयविकाराचा झटका; अवघ्या काही सेकंदात जीव गेला

Uddhav Thackeray: भाजप हा दलालांचा उपटसुंभांचा पक्ष ; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT