bihar crime News Married Women Physical Abuse by 24 year Man in muzaffarpur Saam TV
देश विदेश

Bihar Crime News: संतापजनक! लग्नासाठी माहेरी आलेल्या विवाहितेवर घरात घुसून बलात्कार, २४ वर्षीय तरुणाला अटक

Bihar Latest Crime News: दरम्यान या घटनेनंतर महिलेने स्वत:ची सुटका करून घेत घटनेची माहिती पोलिसांना दिली. तक्रार दाखल होताच पोलिसांनी संशयित आरोपीला अटक केली आहे.

साम टिव्ही ब्युरो

Bihar Latest Crime News: गेल्या काही दिवसांपासून देशभरात महिला अत्याचारांच्या घटनेत मोठी वाढ झाली आहे. पीडिते महिलांकडून तक्रार प्राप्त होताच पोलीस आरोपींच्या मुसक्या आवळत आहेत. अशातच लग्नासाठी माहेरी आलेल्या एका महिलेवर आरोपीने घरात घुसून बलात्कार केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. (Latest Marathi News)

विशेष म्हणजे महिलेवर बलात्कार (Crime News) करणारा आरोपी हा दुसरा तिसरा कोणी नसून तिचा शेजारी असल्याचं समोर आलं आहे. दरम्यान या घटनेनंतर महिलेने स्वत:ची सुटका करून घेत घटनेची माहिती पोलिसांना दिली. तक्रार दाखल होताच पोलिसांनी संशयित आरोपीला अटक केली आहे.

बिहारच्या (Bihar News) मुजफ्फरपुर येथील मनियारी पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही संतापजनक घटना गडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला तिच्या माहेरी एका लग्नासमारंभासाठी आली होती. रविवारी पीडित महिला तिच्या घरात झोपली होती.

महिलेने पोलिसांना (Police) दिलेल्या माहितीनुसार, रात्री जेवण झाल्यावर ती घरातील एका खोलीत शांत झोपली होती. यावेळी घराचे दरवाजे बंद होते. मात्र दरवाजा खाली एक खड्डा होता. ज्यावर विट लावण्यात आली होती. ही विट बाजूला करून आरोपी २४ वर्षीय आरोपी तरुण घऱात शिरला आणि त्याने पीडितेचे हातपाय बांधले आणि तोंड दाबून तिच्यावर बलात्कार केला.

महिलेवर बलात्कार केल्यानंतर तरूणाने पळ काढला होता. त्यानंतर महिलेने लगेचच स्वत:ची सुटका करून आरडाओरड करण्यास सुरुवात केली. त्यानंतर स्थानिकांनी आरोपीला पकडण्याचा प्रयत्न केला, मात्र तो काय हाती लागला नाही. त्यानंतर स्थानिकांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवत त्याला अटक केली.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Local: प्रवासी लोकलखाली आल्याने पश्चिम रेल्वेचे वाहतूक विस्कळीत; पाहा VIDEO

Trisha Krishnan: त्रिशा कृष्णनची राजकारणात एन्ट्री? पोटनिवडणूक लढवण्याची शक्यता

नंदूरबारमध्ये अग्नितांडव! नवापूर MIDC मध्ये कंपनीला भीषण आग, एकापोठापाठ ५ स्फोटामुळे परिसर हादरला

Maharashtra News Live Update: नालासोपारात गटारावरील जाळीत महिलेचा पाय अडकला

Kasara-Manmad Railway: पाच तालुके अन् ४५ गावातून धावणार कसारा-मनमाड रेल्वे; नाशिक-मुंबई प्रवास होणार जलद

SCROLL FOR NEXT