Bihar Crime News Saamtv
देश विदेश

Bihar Crime News: १५० मोमोज खाण्याची पैज लागली; आयुष्याची बाजी लावून तरुण जिंकला, पण...

मोमोज खाण्याच्या पैजेमुळे एका तरुणाला जीव गमवावा लागल्याची धक्कादायक घटना बिहारमध्ये घडली आहे.

Gangappa Pujari

Gopalganj Crime News: मोमोज खाण्याच्या पैजेमुळे एका तरुणाला जीव गमवावा लागल्याची धक्कादायक घटना बिहारमध्ये घडली आहे. बिहारच्या गोपालगंजमध्ये हे प्रकरण उघडकीस आले आहे.

विपिन कुमार पासवान असे या तरुणाचे नाव असून मोमोज खाल्ल्यानंतर त्याला अस्वस्थ वाटू लागल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला. काय आहे हे संपूर्ण प्रकरण; चला जाणून घेवू... (Crime News In Marathi)

काय आहे संपूर्ण प्रकरण?

याबाबत तरुणाच्या वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार, विपिन शुक्रवारी आपल्या दुकानात बसला होता. यावेळी त्याचे मित्र त्याला मोमोज खायला सोबत घेऊन गेले. त्यांची कोण किती मोमोज खाणार याबाबत पैज लागली होती. यावेळी विपीनने 150 मोमोज खाऊन पैज जिंकली.

यानंतर विपिन त्याच्या दुकानात आला. मात्र दुकानात आल्यानंतर थोड्या वेळात त्याला अस्वस्थ वाटू लागले. त्यानंतर बेशुद्ध पडला. घरच्यांनी त्याला तात्काळ रुग्णालयात नेले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर ठावे पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी मृतदेहाचे शवविच्छेदन केले.

या घटनेने मृत तरुणाच्या कुटूंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून मृताच्या वडिलांनी त्याच्या मित्रांवर विष पाजून हत्या केल्याचा आरोप केला आहे. मोमोजमध्ये विष घालून मुलाला मारल्याचा खळबळजनक आरोप त्यांनी केला आहे. पोलिस या घटनेचा अधिक तपास करत आहेत. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शेतकऱ्यांचा बाप काढला म्हणून कानाखाली जाळ काढला; 'स्वाभिमानी'च्या जिल्हाध्याक्षाने बँक मॅनेजरच्या कानाशिलात लगावली Video Viral

School Closed: यवतमाळ जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालयांना सुट्टी; काय आहे कारण?

70 नगरसेवकांचं गुवाहाटीत कुटुंबीयांसह प्रशिक्षण,उल्हासनगर महापालिकेची 65 लाखांची उधळपट्टी, जनतेच्या पैशांवर काय झाडी काय डोंगर?

6 कोटींचा रस्ता महिन्याभरातच उखडला, कंत्राटदार-अधिकाऱ्यांचा टक्केवारीचा झोल, मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेची पोलखोल

हॉकीच्या भगव्या जर्सीवरून वाद, जर्सीच्या रंगावरून राजकारण तापलं

SCROLL FOR NEXT