Bihar Crime Saam Tv
देश विदेश

Crime: अल्पवयीन मुलीचं अपहरण, खोलीत डांबून ठेवलं; मारहाण करत सामूहिक बलात्कार

Bihar Crime: बिहारमध्ये अल्पवयीन मुलीवर दोन तरुणांनी सामूहिक बलात्कार केला. घरातून या मुलीचे अपहरण करण्यात आले. तिला एका खोलीत डांबून ठेवत मारहाण करत तिच्यासोबत हे भयंकर कृत्य करण्यात आले.

Priya More

Summary:

  • बिहारमध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार

  • अपरहण करून नेऊन एका घरात डांबून ठेवलं

  • दोन तरुणांनी मारहाण करत मुलीवर केला सामूहिक बलात्कार

बिहारमध्ये अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची घटना घडली. घरात एकटी असलेल्या मुलीचे अपरहण करून तिला एका खोलीत डांबून ठेवले. त्यानंतर दोन तरुणांनी तिच्यावर आळीपाळीने बलात्कार केला. ही घटना बिहारच्या गोपालगंज जिल्ह्यात घडली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला. दोन्ही आरोपी सध्या फरार असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.

पीडित मुलीच्या आईने पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, पीडित मुलगी घरामध्ये एकटी होती. त्याचवेळी दोन तरुण त्याठिकाणी आले. त्यांनी तिला सोबत नेलं आणि समोरच्या एका घरामध्ये तिला डांबून ठेवलं. त्यानंतर या दोन्ही तरुणांनी पीडितेला बेदम मारहाण केली. त्यानंतर तिच्यावर बलात्कार करण्यात आला. आरोपींनी पीडितेच्या डोळ्यावर मारल्यामुळे तिला व्यवस्थित दिसत नाही.

पोलिस अधिकारी प्रवीण कुमार यांनी सांगितले की, हे प्रकरण प्रेमसंबंधाचे असल्याचे दिसून येत आहे. पीडित मुलीचा जबाब नोंदवला आहे. पीडितेच्या जबाबाच्या आधारे गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिस सध्या पुढील तपास करत आहेत. सध्या पीडित मुलीची वैद्यकीय तपासणी केली जात आहे. दोन्ही आरोपी घटनेनंतर फरार झाले आहेत. आरोपींच्या शोधासाठी पोलिसांनी पथक तयार केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुणे-नाशिक रेल्वे मार्ग बदलल्याप्रकरणी आढळराव पाटलांचा खासदार कोल्हेंवर हल्लाबोल

High blood pressure: सकाळी तुमच्या या ३ सवयींमुळे वाढतोय रक्तदाब आणि कोलेस्ट्रॉल

Times Square Firing: भर दिवसा गोळीबाराचा थरार; मोठ्या आवाजाने रस्त्यावर नागरिकांची धावाधाव, अमेरिका हादरली

महाराष्ट्रावरील ढग गायब, पाऊस गेला कुणीकडे? पुढील २ दिवस कसं असेल हवामान?

PM Kisan : २ लाख शेतकऱ्यांना मोठा झटका, पीएम किसान योजनेचे पैसे बंद, तुमचे नाव तर नाही ना?

SCROLL FOR NEXT