bihar shocking incident AI Photo
देश विदेश

Crime : प्रेमाचा जांगडगुत्ता! एकाच मुलीच्या प्रेमात ३ मित्र वेडे, दोघांनी तिसऱ्याचा गेम केला, नंतर....

bihar shocking incident : बिहारमधील पश्चिम चंपारणमध्ये एकाच मुलीवर प्रेम करणाऱ्या तीन मित्रांपैकी दोन मित्रांनी तिसऱ्याचा खून केला. इम्तियाज नावाच्या विद्यार्थ्याची हत्या करून खंडणीची मागणी करण्यात आली होती. पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे.

Namdeo Kumbhar

Two Friends Murder Class 10 Student Over Girl : तीन मित्रांचा जीव एकीवरच जडला अन् कांड झाला, दोन मित्रांनी मिळून तिसऱ्याची हत्या केली. वाचून धक्का बसला असेल पण हे खरेय. बिहारमध्ये ही घटना घडली आहे. प्रेमात वेडापिसा झालेल्या दोन मित्रांनी तिसऱ्या मित्राची हत्या केली. पोलिसांनी दोन आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. दोन जणांनी तिसऱ्याची हत्या करून खंडणीची मागणीचा मेसेज केला होता.

बिहारमधील पश्चिम चंपारण जिल्ह्यातील बेतियामध्ये एकतर्फी प्रेमामुळे धक्कादायक पाऊल उचलल्याची घटना समोर आली. प्रेमप्रकरणामुळे दहावीच्या वर्गात शिकणाऱ्या इम्तियाज या विद्यार्थ्याची हत्या करण्यात आली. इम्तियाजच्या दोन मित्रांनी मिळून त्याचा काटा काढला. त्यानंतर पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी १० लाख रुपयांच्या खंडणीची मागणीही केली. बुधवारी बेतिया पोलिसांनी या घटनेचा खुलासा झाला. पोलिसांनी दोन्ही आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.

मित्रांनीच काढला मित्राचा काटा

इम्तियाज आणि त्याचे दोन मित्र एकाच मुलीवर प्रेम करत होते. प्रेमात अडथळा ठरत असल्याने दोन मित्रांनी मिळून इम्तियाजचा काटा काढण्याचा प्लान आखला. दोघांनी इम्तियाज याला फोन करून बोलावले आणि चाकूने सपासप वार करत जीव घेतला. हत्या केल्यानंतर इम्तियाज याचा मृतदेह बगहा येथील रामनगरजवळील तौलाहा रेल्वे लाइनजवळ फेकून दिला, अशी माहिती पोलिस अधीक्षक डॉ. शौर्य सुमन यांनी दिली.

हत्याकांड लपवण्यासाठी खंडणी मागितली

हत्येला अपहरणाचे स्वरूप देण्यासाठी दोन आरोपींनी शक्कल लढवली. त्यांनी इम्तियाजच्या कुटुंबाला एक मेसेज पाठवत दहा लाख रूपयांची खंडणी मागतली. यानंतर कुटुंबीयांनी शिकारपूर पोलीस ठाण्यात अपहरणाची तक्रार नोंदवली.त्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली. इम्तियाज शाळेत जायला गेलेला माघारी परतला नव्हता. पोलिसांनी सर्व बाजूने तपास केल्यानंतर रेल्वे लाईनच्या जवळ त्याचा मृतदेह मिळाला. त्यानंतर एकच खळबळ उडाली.

इम्तियाज याच्या हत्याप्रकरणाची पोलिसांनी कसून चौकशी सुरू केली. त्यामध्ये इम्तियाज याचं अपहरण नव्हे तर सुनियोजित हत्याची घटना असल्याचे समोर आले. पोलिसांनी दोघांनाही बेठ्या ठोकल्या अन् चौकशी केली. दोन्ही आरोपींनी गुन्हा कबूल केला. या हत्याकांडात आणखी कुणाचा समावेश आहे का? याचा शोध पोलीस घेत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dry Fruits: पावसाळ्यात ड्राय फ्रुट्स साठवण्यासाठी वापरा 'या' सिंपल टिप्स

Sunday Horoscope : आषाढी एकादशीला होणार विष्णूची कृपा; 'या' राशींच्या लोकांवर धनाचा वर्षाव होणार

Ind vs Eng Live, 2nd Test: अबब! इंग्लंडच्या संघासमोर ६०० पेक्षा जास्त धावांचं आव्हान; टीम इंडियाकडून डाव घोषित

एकत्र आलो एकत्र राहण्यासाठी; गर्दी मराठी भाषेवरच्या अन्यायाविरोधातील, वरळीतल्या ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची

8 Hour Sleep: शरीराला ८ तासाच्या झोपेची आवश्यकता का आहे? वाचा महत्वाचे कारण

SCROLL FOR NEXT