Ambarnath Accident News Saam tv
देश विदेश

Bihar Accident News : अंधाऱ्या रात्रीत काळाचा घाला; भीषण अपघातात ५ जणांचा जागीच मृत्यू

Five Die In Arwal Road Accident : पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली असून मृतदेह ताब्यात घेतले आहेत.

Ruchika Jadhav

Bihar News : बिहारमधून अपघाताची एक मोठी बातमी समोर आली आहे. बिहारच्या (Bihar) अवरल येथे ट्रक आणि रिक्षाचा भीषण अपघात झाला आहे. हा अपघात इतका भयावह होता की यात जागीच ५ जणांचा मृत्यू झालाय. अपघात होताच रस्त्यावर सर्वच प्रवाशांचा मोठा गोंधळ उडाला. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. (Latest Accident News)

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, शुक्रवारी रात्री राष्ट्रीय महामार्ग १३९ वर हा भीषण अपघात (Accident) झाला आहे. ट्रक आणि रिक्षा दोन्हीही औरंगाबादच्या दिशेने जात होत्या. त्यावेळी पुढे असलेल्या रिक्षामध्ये ५जण प्रवास करत होते. मागून भरधाव वेगाने आलेल्या ट्रकने रिक्षाला पाठीमागून जोरदार धडक दिली. या धडकेत रिक्षा काही अंतरावर पुढे फेकली गेली.

अपघात इतका भीषण होता की यात रिक्षाचे वरचे छत देखील निघाले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. मृत व्यक्तींची ओळख अद्याप पूर्ण पटली नसून ते जगदीशपुर आरा येथील रहिवासी असल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.

उपघातानंतर रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती. तब्बस तास भर रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. पोलिसांनी यावेळी मृतदेह ताब्यात घेतल्यानंतर वाहतूक सुरळीत करण्यात आली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Navale Bridge Accident: पुण्यातील नवले ब्रिजवर अपघाताचं सत्र सुरुच, भरधाव कार महामार्गावर उलटली | VIDEO

Maharashtra Live News Update : घरगुती गॅसचा अवैध वापर केल्या प्रकरणी पहिला गुन्हा दाखल

Monalisa Love Story : "६ महिने ६० वर्षांसारखे जगलो..."; मोनालिसाच्या नवऱ्याने सांगितली प्रेम कहाणी, वाचा काय म्हणाला

Skin Care : त्वचेवर दिवसातील कोणत्या वेळेस कोरफडीचे जेल लावावे? जाणून घ्या फायदे

Vidhan Bhavan Threat Mail: मुंबईत ४ ठिकाणी बॉम्बने उडवण्याची धमकी; पाहा ईमेलमध्ये नेमकं काय?

SCROLL FOR NEXT