Loudspeaker Saam TV
देश विदेश

लाऊडस्पीकरच्या वादावर भाजप आमदाराचं मोठं वक्तव्य

दररोज या मुद्द्यावर कोणाचे ना कोणाचे वक्तव्य

साम टीव्ही ब्युरो

भोपाळ: लाऊडस्पीकरवरून (loudspeaker) सुरू असलेला वाद थांबण्याचे नाव घेत नाही आणि दररोज या मुद्द्यावर कोणाचे ना कोणाचे वक्तव्य समोर येत आहे. आता भाजप आमदार (BJP MLA)आकाश विजयवर्गीय यांनी लाऊडस्पीकरच्या वादावर मोठे वक्तव्य (Statement) केले आहे. त्यांनी म्हटले आहे की, 'ज्यांना ऐकायचे नाही, त्यांना अजानचा आवाज ऐकण्याची सक्ती करू नये. (Big statement BJP MLA on loudspeaker controversy)

हे देखील पाहा-

विधानसभा मतदारसंघ क्रमांक ३ मध्ये भाजप आमदार आकाश विजयवर्गीय यांच्याकडून ७ दिवसीय श्रीमद भागवत कथेचे आयोजन करण्यात आले आहे. ११ मे रोजी या भागवत कथा कार्यक्रमाची भव्य भजन संध्या आयोजित केली जाणार आहे. या भजन संध्याकाळला भाजप आमदाराने इंदूरच्या (Indore) जनतेला उपस्थित राहण्याचे निमंत्रण दिले. यादरम्यान लाऊडस्पीकरच्या वादावर ते म्हणाले की, मला काहीही ऐकायचे नसेल तर जबरदस्तीने ऐकावे लागते, हे चुकीचे आहे. ज्याला त्यांच्या धर्मावर विश्वास आहे, त्याला रोज नमाज अदा करायचा आहे, बंद खोलीत वाचायचा आहे. ज्यांना ऐकायचं नाही त्यांना ऐकायची काय गरज!

शहरात सुख, शांती आणि समृद्धी नांदावी या उद्देशाने भागवत कथेचे आयोजन करण्यात येत असल्याचे भाजप आमदारांनी सांगितले. भागवत कथेचे वाचन परमपूज्य भास्करानंद यांच्या शिष्या साध्वी कृष्णानंद करत आहेत. भजन संध्यामध्ये अनेक लोकप्रिय भजन गायक सहभागी होणार आहेत. सध्या भाजपचे आमदार या कार्यक्रमाच्या तयारीत गुंतले आहेत.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking : अल्पवयीन मुलीला फ्लाईंग किस देणं पडलं महागात, तरुणाला भोगावा लागणार ३ वर्षाचा तुरुंगवास

Maharashtra Live News Update: अमोल कोल्हे यांचा गौप्य स्फोट

AI इम्पॅक्ट समिटमध्ये PM मोदींविरोधात घोषणा, युवा काँग्रेसच्या आंदोलनामागचं कारण काय?

Spinach Paneer Toast Recipe: पिझ्झा-बर्गर विसरून जाल! मुलांसाठी बनवा सुपर हेल्दी क्रिस्पी पालक पनीर टोस्ट; रेसिपी आहे एकदम सोपी

Tata Punch EV Price: 15 मिनिटांत चार्ज होणारी टाटा पंच इलेक्ट्रिक भारतात लॉन्च; परवडणारी किंमत, 468 KM रेंज अन् बरंच काही, वाचा सविस्तर

SCROLL FOR NEXT