Tamilnadu Government: Saam Tv
देश विदेश

Tamilnadu Government: शाळेत विद्यार्थ्यांना मिळणार चिकन बिर्याणी, 'या' राज्य सरकारचा मोठा निर्णय

Tamil Nadu government chicken biryani scheme for students: तामिळनाडू सरकार शाळकरी विद्यार्थ्यांसाठी मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. शाळेत विद्यार्थ्यांना मिळणार चिकन बिर्याणी मिळणार आहे.

Priya More
  • तामिळनाडूतील शाळांमध्ये मिळणार चिकन बिर्याणी

  • सरकार मध्यान्ह भोजन योजनेत मोठा बदल करणार

  • सरकारी शाळांतील विद्यार्थ्यांना मुख्यमंत्री देणार मोठं गिफ्ट

  • मुख्यमंत्री थलपती विजय यांची नवी योजना

तामिळनाडूतील शाळकरी विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. मुख्यमंत्री थलपती विजय यांनी शाळकरी विद्यार्थ्यांसाठी एक मोठं गिफ्ट दिलं आहे. थलपती विजय यांचे टीव्हीके सरकार दर आठवड्याला शाळकरी विद्यार्थ्यांना चिकन बिर्याणी देण्याचा निर्णय घेण्याची तयारी करत आहे. यासंदर्भात एका प्रस्तावाचा आढावा घेतला जात आहे. त्याची लवकरच अंमलबजावणी केली जाऊ शकते.

इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, ही योजना राबवण्यासाठी तामिळनाडूच्या शालेय पोषण योजनेत बदल करण्यात येणार आहे. या नवीन बदलांमध्ये, सरकारी शाळेतील विद्यार्थ्यांना आठवड्यातून एकदा चिकन बिर्याणी देण्याचा प्रस्ताव आहे. यावर सरकार गांभीर्याने विचार करत आहे. राज्याचे शालेय शिक्षणमंत्री राजमोहन यांनी अलीकडेच मुख्यमंत्री सी.जोसेफ विजय यांच्यासमोर हा प्रस्ताव मांडला होता.

शिक्षणमंत्री राजमोहन यांनी या प्रस्तावाबाबत बोलताना तामिळनाडूच्या राजकीय इतिहासाचा आणि मुलांसाठीच्या सध्याच्या पोषण आहार कार्यक्रमाचा संदर्भ दिला. के. कामराज यांनी मध्यान्ह भोजन योजना सुरू केली होती, करुणानिधी यांनी त्यात अंड्यांचा समावेश केला, एम. जी आर यांनी त्याचे पौष्टीक भोजन कार्यक्रमात रुपांतर केले, जयललिता यांनी आठवडाभर अंड्यांचे वितरण सुरू केले. त्याप्रमाणे माझी इच्छा आहे की आपल्या सरकारच्या काळात सरकारी शाळांमधील विद्यार्थ्यांना आठवड्यातून एकदा चिकन बिर्यांणी दिली जावी. मुख्यमंत्री विजय या प्रस्तावाचा आढावा घेत असून अंतिम निर्णय लवकरच घेतला जाईल.

दरम्यान, मध्यान्ह भोजन योजना तामिळनाडूमध्ये सुरू झाली. १९५० च्या दशकात तत्कालीन मुख्यमंत्री के. कामराज यांच्या नेतृत्वाखाली ही योजना सुरू करण्यात आली होती. त्यानंतरच्या सरकारांनी शाळेतील उपस्थिती सुधारण्यासाठी आणि कुपोषणाची समस्या सोडवण्यासाठी वारंवार बदल केले आहेत. जर मुख्यमंत्री विजय यांनी या प्रस्तावाला मंजुरी दिली तर हा भारतातील इतर कोणत्याही राज्यापेक्षा वेगळा आणि अद्वितीय उपक्रम ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

8th Pay Commission: दुर्गापूजेपूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांना बोनस मिळणार? मोठी मागणी समोर

5 Energy Booster Ladoo: ताकद आणि पोषणाचा खजिना! आरोग्यासाठी फायदेशीर ठरतील ‘हे’ ५ एनर्जी बुस्टर लाडू

Maharashtra News Live Update: देशातून फरार असलेला निलेश घायवळ खंडणी प्रकरणात निर्दोष मुक्त

Neeru Dhanda Asian Games 2026: नीरू ढांडाचा ट्रॅप शूटिंगमध्ये 'सुवर्ण'वेध, भारताला पाचवं गोल्ड मेडल

Maharashtra Drought: शेतकऱ्यांना दिलासा! दुष्काळात वगळलेल्या तालुक्यांचा यादीत समावेश, फडणवीस सरकारचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT