India-Bound Cargo Ship Hijacked by Houthi Rebels Saam Tv
देश विदेश

Cargo Ship Hijacked: तुर्कियेहून भारताकडे निघालेल्या मालवाहू जहाजाचे हौथी बंडखोरांनी केलं अपहरण, IDF ने ट्विट करत दिली माहिती

तुर्कियेहून भारताकडे निघालेल्या मालवाहू जहाजाचे हौथी बंडखोरांनी केलं अपहरण, IDF ने ट्विट करत दिली माहिती

Satish Kengar

India-Bound Cargo Ship Hijacked by Houthi Rebels:

येमेनच्या हुथी बंडखोरांनी रविवारी तुर्कियेहून भारताकडे जाणाऱ्या मालवाहू जहाजाचे अपहरण केल्याची बातमी समोर येत आहे. इस्रायल डिफेन्स फोर्सने (IDF) ट्विटरवर एका पोस्टद्वारे ही माहिती दिली.

IDF पोस्टनेमध्ये म्हटलं आहे की, ''येमेनजवळील दक्षिण लाल समुद्रात हुथी बंडखोरांनी मालवाहू जहाजाचे अपहरण केले आहे. जागतिक स्तरावर ही अत्यंत गंभीर घटना आहे. हे जहाज तुर्कियेहून निघाले होते आणि भारताकडे जात होते, ज्यामध्ये अनेक देशांचे नागरिक होते. यामध्ये इस्रायलींचा सहभाग नाही किंवा ते इस्रायली जहाजही नाही.'' ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

येमेनच्या हुथी बंडखोरांनी आज इस्रायली जहाजांना धमकी दिली होती. यात म्हटलं गेलं होतं की, ते इस्त्रायली कंपन्यांच्या मालकीच्या किंवा चालवलेल्या जहाजांना लक्ष्य करतील. इस्त्रायलचा ध्वज फडकवणारे कोणतेही जहाज पेटवून दिले जाईल, असेही त्यांच्याकडून सांगण्यात आले होते. (Latest Marathi News)

हुथी बंडखोरांच्या प्रवक्त्याने याबाबत एक निवेदन जारी केले आहे. इतर देशांनी याकडे लक्ष देण्याची आणि अशा जहाजांवर काम करणाऱ्या आपल्या नागरिकांना परत बोलावण्याची गरज असल्याचे त्यात म्हटले आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच हौथी बंडखोरांनी सौदी अरेबियातील जेद्दाह येथील तेलसाठ्यावर हल्ला केला होता. दोन वर्षांपूर्वीही येथे हल्ला करण्यात आला होता. सौदी अरामको या सौदी राज्य तेल कंपनीच्या तेलसाठ्यावर नोव्हेंबर 2020 मध्ये हुथी बंडखोरांनी क्षेपणास्त्राने लक्ष्य केले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maheshwari Saree Designs: साध्या पण दिसायला भारी महेश्वरी साड्यांची भलतीच क्रेझ, या आहेत 5 डिझाईन्स

Two New Airlines:नव्या दोन एअरलाईन्सची विमानं आकाशात भरणार उड्डाण; केंद्र सरकारची मंजुरी

'हिंदूंनो 4 मुलं जन्माला घाला'; राणांचा सल्ला, विरोधकांचा हल्ला, VIDEO

Maharashtra Politics : भाजपला रोखण्यासाठी पवार काका-पुतण्या एकत्र? सुप्रिया सुळेंनी दिले सूचक संकेत

BMC Election : शिंदेंना हव्यात तिजोरीच्या चाव्या; BMCसाठी भाजप-शिंदेसेनेमधला पेच कायम, VIDEO

SCROLL FOR NEXT