ऑगस्टपासून Facebook, Twitter मध्ये होणार मोठे बदल! Saam Tv
देश विदेश

ऑगस्टपासून Facebook, Twitter मध्ये होणार मोठे बदल!

येत्या ऑगस्टपासून फेसबुक आणि ट्विटर बदलणार आहे. आता यावेळी काय मोठे बदल होणार आहेत? याची उत्सुकता आहे.

वृत्तसंस्था

पुणे : येत्या ऑगस्टपासून फेसबुक आणि ट्विटर बदलणार आहे. आता यावेळी काय मोठे बदल होणार आहेत? याची उत्सुकता आहे. एक नंबर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म असलेले फेसबुक Facebook आणि ट्विटर Twitter वापरकर्त्यानमध्ये खूप लोकप्रिय आहेत. देश आणि जगाशी संबंधित अपडेट असो वा आणखी माहिती ही या ऍप्स मुळे मिळत असते. नवीन मिळालेल्या माहितीनुसार Facebook,Twitter मध्ये नवीन बदल होणार आहेत. त्यानुसार या प्लॅटफॉर्मवर तुम्हाला तुमचे विचार व्यक्त करण्याचे संधी मिळते.

परंतु माहितीनुसार, पुढच्या महिन्यापासून म्हणजेच ऑगस्टपासून फेसबुक आणि ट्विटर या दोन प्लॅटफॉर्मशी संबंधित नियमांमध्ये काही मोठे बदल होणार आहेत. त्याचा थेट परिणाम यूजर्सवर होईल. ट्विटरचे एक विशेष फीचर Fleet हे येत्या ऑगस्ट महिन्यापासून बंद होणार आहे. त्याचबरोबर, सर्वात मोठं फेसबुकवर देखील पेमेंटचे फीचर जोडणार आहे.

यूजर्सना मोठा धक्का देत ट्विटरने आपले Fleet फीचर हे बंद करण्याचा निर्णय घेत आहे. आतापासून यूजर्सना या फीचर अनुभवू शकणार नाहीत. फ्लीट फीचरबद्दल म्हणजे ते आपोआप 24 तासात फोटो किंवा मजकूर दिलीट करते. कंपनीने सांगितले की, लोक त्यांच्या ट्विटरचा रिच वाढविण्यासाठी आणि जाहिरात वाढवण्यासाठी फ्लीट फीचरचा वापर करतात. त्यामुळे कंपनीने 3 ऑगस्टपासून फ्लीट फीचर बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

Edited By-Sanika Gade

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dhule Rain: अवकाळीचा फटका 'लालपरी'ला, एसटी बसला लागली गळती; VIDEO व्हायरल

8th Pay Commission: 8व्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट, केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात 34% ने वाढ?

महाराष्ट्रात बदल्याचा धडाका कायम; आता २५ बड्या IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, कुणाची कुठे नियुक्ती?

Pune : पुणे बनतंय ड्रग्ज कॅपिटल; अल्पवयीन मुलीमुळे ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश

Maharashtra Politics: राज्याच्या राजकारणात आणखी एक भूकंप? राष्ट्रवादी-शिंदेसेनेचे 50 आमदार भाजपात जाणार, बड्या नेत्याचा दावा

SCROLL FOR NEXT