Maharashtra Political Crisis Supreme Court Hearing Saam TV
देश विदेश

Maharashtra Politics : ठाकरे गटाला मोठा धक्का! सुप्रीम कोर्टाने काय निर्णय दिला? वाचा...

न्यायालयाने ठाकरे गटाकडून होणारी ७ सदस्यांचे घटनापीठ नेमण्याची मागणी फेटाळली आहे.

साम टिव्ही ब्युरो

Maharashtra Political crisis : ठाकरे गटाला एक मोठा धक्का बसला आहे. सर्वोच्च न्यायालयाने ठाकरे गटाकडून होणारी ७ सदस्यांचे घटनापीठ नेमण्याची मागणी फेटाळली आहे. त्यामुळे राज्यातील सत्तासंघर्षाची सुनावणी तूर्तास ५ सदस्यीय घटनापीठासमोरच होणार असल्याचं स्पष्ट झालं. आता याप्रकरणाची पुढील सुनावणी ५ सदस्यीय घटनापीठासमोरच २१ फेब्रुवारीला होणार आहे.  (Latest Marathi News)

महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावरील एका मुद्द्यावर सुप्रीम कोर्टानं (Supreme Court) आज निकाल दिला. यामध्ये ७ सदस्यीय खडंपीठाकडं या प्रकरणाची सुनावणी व्हावी, ही ठाकरे गटाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली. त्यामुळं तुर्तास हे प्रकरण आता सात सदस्यीय खंडपीठासमोर जाणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे. तसेच या खटल्यातील मेरिटनुसार यावर निर्णय घेतला जाणार आहे.  (Maharashtra Political News)

आज सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी एक पानी निकालाचे वाचन केले. यामध्ये नबाम रेबीया प्रकरणाच्या गुणवत्तेवर चर्चा करण्यात आली. त्यानंतर  नबाम रेबियाचे प्रकरण सात न्यायमूर्तीकडे जाण्यासाठी पात्र नाही, त्यामुळे हे प्रकरण ५ न्यामूर्तींच्या खंडपीठकडे राहणार आहे.

सुप्रीम कोर्टाच्या 5 सदस्यीय घटनापीठाने निर्णय सुनावताना म्हटलं की, अरुणाचल प्रदेशातील नबाम रेबिया केसमध्ये सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयाचा महाराष्ट्रातील राजकारणावर कसा परिणाम झाला, हे आधी समजावून घ्यावं लागेल. यावर सविस्तर युक्तिवाद ऐकून गुणवत्तेच्या आधारावर हे प्रकरण 7 सदस्यीय घटनापीठाकडे पाठवायचं की नाही, यावर निर्णय घेऊ शकतो, असं सरन्यायाधीश यांनी सांगितलं आहे.

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत फूट पडल्यानंतर राज्यात निर्माण झालेल्या सत्तासंघर्षावर गेले तीन दिवस सुरू असलेला युक्तिवाद गुरुवारी पूर्ण झाला होता. मात्र, सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्या नेतृत्वाखालील घटनापीठाने या प्रकरणावरील निकाल राखून ठेवला होता. आज या निकालाचे वाचन करण्यात आले. आता याबाबतची पुढील सुनावणी २१ फेब्रुवारीला होणार आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

How To Make Onion Oil: केसांच्या वाढीसाठी कांद्याचं तेल कसे बनवायचे?

Kalyan News : उल्हास नदी वाचवा, ग्रामस्थांकडून निषेधाची होळी; थेट दिला आंदोलनाचा इशारा

Ladki Bahin Yojana: फेब्रुवारीचा हप्ताही लांबणीवर? लाडक्या बहिणींना कधी मिळणार १५०० रुपये? काय आहे नवी अपडेट

मुंबईत सराफा दुकानात ६.७९ कोटींची चोरी; ४५ दिवसांत गुन्ह्याचा उलगडा

CISF जवानाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू; डोंबिवली परिसरात हळहळ

SCROLL FOR NEXT