Bhihar Crime News Devar Bhabhi Love Affair Wife Killed Husband after Marriage three days  Saam TV
देश विदेश

Shocking News: धुमधडाक्यात लग्न लागलं, पण हनिमूनच्या रात्रीच नवरीने नवऱ्याला संपवलं; कारण ऐकून पोलिसही चक्रावले

Bride killed Groom Shocking News: धुमधडाक्यात लग्न लागलं, पण हनिमूनच्या रात्रीच नवरीने नवऱ्याला संपवलं, नवरीला अटक

साम टिव्ही ब्युरो

Bride killed Groom Shocking News: धुमधडाक्यात लग्न लागलं. नवरीला घेऊन नवरा मुलगा घरी आला. घरात नववधूचं आगमन झाल्यानंतर आनंदाचं वातावरण होतं. दुसऱ्या दिवशी दोन्ही कुटुंबांकडून सत्यनारायणाची पूजा देखील करण्यात आली. हनिमूनच्या रात्रीच नवरा मुलगा गायब झाला. नातेवाईकांनी त्याचा सगळीकडे शोध घेतला पण त्याचा काही पत्ता लागला नाही. (Latest Marathi News)

त्यानंतर तो बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिसात दाखल करण्यात आली. पोलिसांनी नवऱ्या मुलाचा शोध घेतला असता, त्याचा मृतदेह एका अज्ञातस्थळी रक्ताने माखलेल्या अवस्थेत आढळून आला. या तरुणाची हत्या झाली असावी, असा संशय पोलिसांना होता.

पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली असता, सर्वांनाच हादरवून टाकणारी माहिती समोर आली. हनिमूनच्या दिवशी पत्नीनेच पतीची हत्या केल्याचं पोलिस तपासात उघड झालं. ही धक्कादायक घटना बिहारच्या (Bihar News) गया येथे घडली. या घटनेनं परिसरात मोठी खळबळ उडाली.

अशोक कुमार असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी त्याची पत्नी रेवती कुमारी हिच्यासह एकाला अटक केली आहे. मिळालेला माहितीनुसार, गयामधील लकडाही गावात राहणाऱ्या अशोक कुमारचं लग्न २९ मे रोजी रेवती कुमारीसोबत झालं होतं.

अशोक ३० मे रोजी आपल्या नवरीला घरी घेऊन आला होता. लग्नाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे ३१ मे रोजी काही रितीरिवाज केल्यावर अशोक गायब झाला होता. नातेवाईकांनी त्याचा सगळीकडे शोध घेतला पण त्याचा काही पत्ता लागला नाही.

त्यानंतर तो बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिसांत (Police) दाखल करण्यात आली. १ जून रोजी अशोकचा रक्ताने माखलेला मृतदेह आढळून आला. धारदार हत्याराने त्याचा गळा कापण्यात आला होता. अशात पोलिसांनी यासंबंधी चौकशी सुरू केली. तेव्हा पोलिसांसमोर हत्येबाबत धक्कादायक खुलासा झाला.

अशोक कुमार याची हत्या रेवती कुमारी आणि तिच्या मावस बहिणीचा पती उपेंद्र यानेच केल्याचं समोर आलं. रेवती हिचे मावस बहिणीच्या पतीसोबत प्रेमसंबंध (Crime News) होते. याची खबर अशोकला लागली होती. अशात लग्नाच्या रितीरिवाजा दरम्यानच महिलेने पतीच्या हत्येचा प्लान केला.

रेवतीला ताब्यात घेऊन चौकशी केली, तेव्हा तिने सगळं काही सांगितलं. आरोपी रेवतीने सांगितलं की, लग्नाच्या पहिल्याच रात्री तिने आपल्या प्रियकराला रूममध्ये बोलावलं. यानंतर दोघांनी मिळून अशोकची हत्या केली. या घटनेनं परिसरात मोठी खळबळ उडाली असून पोलिसांनी आरोपी नवरीला अटक केली आहे. तिच्या प्रियकराचा शोध सुरू आहे.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sangli : सौरऊर्जा प्रकल्पाच्या नावाखाली १२००० झाडांची कत्तल, गावकऱ्यांना ठेवलं अंधारात

Nagpur Crime : पबमध्ये पार्टीत राडा झाला, ५ जणांनी पहाटे बाहेर गाठले अन् रस्त्यावर हत्या केली

Gemini Yearly Horoscope 2026: प्रत्येक कामात यश, प्रगतीने मार्ग होणार खुले...; जाणून घ्या मिथुन राशींसाठी कसं असणार नवं वर्ष?

Besan Dishes : चटपटीत काहीतरी खाण्याची इच्छा होते? मग झटपट बनवा बेसन पासून बनणाऱ्या या ७ डिशेस

Maharashtra Live News Update: त्र्यंबकेश्वर मंदिरातील VIP दर्शनसेवा बंद

SCROLL FOR NEXT