Rahul Gandhi Vs Mamata Banerjee Saam Tv
देश विदेश

Congress Vs TMC: काँग्रेस आणि टीएमसी आमनेसामने; राहुल गांधींच्या रॅलीला परवानगी देण्यास ममता सरकारचा नकार

Rahul Gandhi Vs Mamata Banerjee: काही दिवसांपूर्वी इंडिया आघाडीच्या बैठकीत एकत्र दिसणारे काँग्रेस आणि तृणमूल यांच्यातील तणाव आता वाढत चालला आहे. राहुल गांधींच्या जाहीर सभेला पश्चिम बंगाल प्रशासनाने परवानगी नाकारली आहे.

Satish Kengar

Rahul Gandhi Vs Mamata Banerjee:

काही दिवसांपूर्वी इंडिया आघाडीच्या बैठकीत एकत्र दिसणारे काँग्रेस आणि तृणमूल यांच्यातील तणाव आता वाढत चालला आहे. राहुल गांधींच्या जाहीर सभेला पश्चिम बंगाल प्रशासनाने परवानगी नाकारली आहे.

रविवारी राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील भारत जोडो न्याय यात्रेचा एक भाग म्हणून सिलीगुडी येथे जाहीर सभा होणार होती. मात्र पोलिसांची परवानगी न मिळाल्याने ती रद्द करण्यात आली. काँग्रेस नेत्यांचे म्हणणे आहे की, पुढील सभा फलाकाटा, अलीपुरद्वार येथे होणार आहे. मात्र याबाबत निश्चितपणे काहीही सांगता येणार नाही. परवानगी न मिळाल्याने या जाहीर सभेलाही धोका निर्माण झाला आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सिलीगुडीचे पोलीस अधिकारी सी सुधाकर यांनी सांगितले की, रविवार दोन परीक्षा होणार आहेत. यामध्ये पोलीस भरती परीक्षेचाही समावेश आहे. अशा परिस्थितीत लाऊडस्पीकर वाजवायला आणि गर्दी जमवायला परवानगी देता येत नाही. परीक्षेची तारीख आधीच ठरलेली होती. बैठकीचा आराखडा नंतर सांगितला गेला. (Latest Marathi News)

आसामनंतर काँग्रेसची न्याय यात्रा गुरुवारी पश्चिम बंगालमध्ये पोहोचली. दरम्यान, राहुल गांधी दोन दिवसांची विश्रांती घेऊन दिल्लीत परतले होते. आता 28 जानेवारीला पुन्हा प्रवास सुरू होत आहे. ही यात्रा जलपाईगुडी, अलीपुरद्वार, उत्तर दिनाजपूर, दार्जिलिंग मार्गे निघून बिहारमध्ये पोहोचेल.

दरम्यान, राहुल गांधी पश्चिम बंगालमध्ये आहेत. यातच ममता बॅनर्जीही अनेक जिल्ह्यांमध्ये जाहीर सभा घेणार आहेत. ममता बॅनर्जी यांनी यापूर्वीच राज्यात लोकसभा निवडणूक स्वबळावर लढणार असल्याचे जाहीर केले आहे. ममता बॅनर्जी आता कूचबिहार, उत्तर दिनाजपूर, दक्षिण दिनाजपूर, मालदा, मुर्शिदाबाद आणि नादिया येथे 2 फेब्रुवारीपर्यंत सभा घेणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

चिमुकल्यांच्या पोषण आहाराचा पर्दाफाश; सेविकेवर कारवाई, आता प्रशासनाने घेतला मोठा निर्णय!

पाण्याचा प्रश्न सुटणार? 140 एकरांसाठी ब्रिजस्टोन इंडियाची मोठी घोषणा! नेमका काय आहे प्रोजेक्ट?

Maharashtra News Live Update: राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांची भाजपविरोधात आक्रमक भूमिका

Sambhajinagar: आत्महत्या करणाऱ्या तरुणाला वाचवायला गेले, डोंगरावरून पडून आई-वडील अन् मुलाचा मृत्यू; संभाजीनगर हादरले

Chandra Grahan 2026: रक्षाबंधनाला चंद्रग्रहणाचे सावट! भारतात सुतक लागणार की नाही?

SCROLL FOR NEXT