NAsal Vaccine SAAM TV
देश विदेश

Nasal Vaccine: नाकावाटे देणाऱ्या कोरोना लसीसाठी किती पैसे मोजावे लागतील? चेक करा खासगी आणि सरकारी रुग्णालयांतील दर

सरकारने गेल्या आठवड्यात नेझल व्हॅक्सिनला मंजुरी दिली आहे. लवकरच ही लस उपलब्ध होईल.

साम टिव्ही ब्युरो

Corona Nasal Vaccine: चीनमध्ये कोरोनाच्या वाढता धोका पाहता भारत सरकार सतर्क झालं आहे. कोरोनाला थोपवण्यासाठी सर्व तयारी केंद्र सरकार करत आहे. भारतात सध्यातरी परिस्थिती सामान्य आहे. मात्र खबरदारी म्हणून सरकारने पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. (Corona Vaccine)

सरकारने गेल्या आठवड्यात नेझल व्हॅक्सिनला मंजुरी दिली आहे. लवकरच ही लस उपलब्ध होईल. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नाकातील लसीची किंमत एक हजार रुपये असू शकते. यामध्ये, लसीची किंमत 800 रुपये असेल. तर जीएसटी आणि रुग्णालय शुल्कासह लस 1000 रुपयांमध्ये उपलब्ध होईल.तर सरकारी दवाखान्यांमध्ये ही लस 325 रुपयांना उपलब्ध होईल. (Latest Marathi News)

भारत बायोटेकची इंट्रानेझल लस iNCOVACC गेल्या आठवड्यातच कोरोना लसीकरण कार्यक्रमात समाविष्ट करण्यात आली होती. आता या लसीची किंमत 800 रुपये असून त्यावर 5 टक्के जीएसटी आकारण्यात येणार असल्याची माहिती आहे.

कोवॅक्सिन किंवा कोविशील्डने पूर्णपणे लसीकरण झालेल्या लोकांसाठी इंट्रानेसल लस यापूर्वी बूस्टर शॉट म्हणून मंजूर करण्यात आली होती. मीडिया रिपोर्ट्सनुसार, जानेवारीच्या अखेरीस ज्यांनी कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत त्यांच्यासाठी ही लस उपलब्ध होईल.

मिळालेल्या माहितीनुसार, खासगी रुग्णालयांना कोरोना लसीच्या प्रत्येक डोससाठी 150 रुपयांपर्यंत शुल्क आकारण्याची परवानगी देण्यात आली आहे. यासह लसीची किंमत 1000 रुपये होऊ शकते. सेंट लुईस येथील वॉशिंग्टन युनिव्हर्सिटीच्या परवानाप्राप्त तंत्रज्ञानावर नाकावरील लस विकसित करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नांदेड जिल्ह्यात मान्सून पूर्व पावसाची जोरदार हजेरी

Shocking: भुकेनं व्याकुळ मुलानं दूध मागितलं, संतापलेल्या बापानं ४ वर्षाच्या पोराला दरवाजावर आपटलं

राज्यातील 80 लाख महिला अपात्र! ₹1500 सरकारच्या डोळ्यात खुपताय का?

पोटावरची चरबी झटक्यात उतरेल! सकाळी दुधासोबत प्या 'या' हिरव्या पानांची पावडर

Satbara Utara : कामाची बातमी! ५ मिनिटात घरबसल्या काढा सातबारा, फक्त ₹१५ होणार खर्च; पाहा 7/12 ऑनलाइन काढण्याची सोपी प्रोसेस

SCROLL FOR NEXT