Bengaluru Saam
देश विदेश

Shocking: दबक्या पावलाने आला अन् नको त्या भागाला स्पर्श करून पळाला; मध्यरात्री तरुणींसोबत भयंकर घडलं, घटना CCTVत कैद

Woman Molested in Public Accused Flees the Scene: बंगळुरूमध्ये भररस्त्यावर महिलेचा विनयभंग. घटना सीसीटीव्हीमध्ये कैद. परिसरात भीतीचे वातावरण. आरोपीविरोधात गुन्हा दाखल.

Bhagyashree Kamble

बंगळुरूमधून एक संतापजनक बातमी समोर येत आहे. मध्यरात्रीच्या सुमारास भररस्त्यावर एका व्यक्तीने महिलेचा विनयभंग केला आहे. नंतर तेथून पळ काढला आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे. या घटनेची माहिती परिसरात पसरल्यानंतर काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या घटनेमुळे महिला खरंच सुरक्षित आहेत का? असाही प्रश्न निर्माण होत आहे.

बंगळुरू पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २ महिला एका अरुंद गल्लीतून जात होते. या दरम्यान, एक व्यक्ती महिलांच्या मागून चालत होता. चालत असताना त्याने एका महिलेची वाट अडवली. तसेच तिची छेड काढली आणि स्पर्श करून विनयभंग केला. या घटनेनंतर घाबरलेल्या महिला त्या परिसरातून पळून जातात.

ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाली आहे. बंगळुरू पोलिसांच्या म्हणण्यानुसार, अद्याप अज्ञात आरोपीविरोधात महिलेने कोणतीही तक्रार दाखल केलेली नाही. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला आहे. या प्रकरणी आरोपीविरोधात कलम ३५४ ब अंतर्गत एफआआर दाखल करण्यात आला आहे. ही तक्रार महिलेने नसून, एका स्थानिक रहिवाशाने पोलीस ठाण्यात केली आहे.

बेंगळुरूमध्ये महिलांवरील लैंगिक छळाच्या घटना वारंवार घडत आहेत.. या वर्षाच्या सुरुवातीला, जानेवारीमध्ये, एका २४ वर्षीय महिलेचा कॅबमध्ये विनयभंग केला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

विलास घुले मृत्यू प्रकरण तापलं! खासदाराच्या मुलाला अटक करा नाहीतर...; जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घुले कुटुंबीयांचे आमरण उपोषण

'गुंगी गुडिया'ला धनंजय मुंडेच जबाबदार? सुनील तटकरेंनी मुंडेंचे कान टोचले

कुणबी नोंदींचा वाद पुन्हा पेटणार, 4 लोकप्रतिनिधींचे कुणबी प्रमाणपत्र अवैध

संजय शिरसाटांचं मंत्रिपद धोक्यात? इतर 3 मंत्र्यांवरही टांगती तलवार? मोठी खळबळ

राज्यात अ‍ॅनालॉग पनीरवर बंदी, ग्राहकांची कृत्रिम पनीरपासून सुटका

SCROLL FOR NEXT