Bengaluru News  Saam tv
देश विदेश

Crime News : खळबळजनक! आधी तरुणीची हत्या केली, नंतर सुटकेसमध्ये मृतदेह भरून धावत्या ट्रेनमधून फेकलं

Bengaluru Crime News : बेंगळुरुत १८ वर्षीय तरुणीची हत्या करून मृतदेह सुटकेसमध्ये भरून ट्रेनमधून फेकल्याची घटना घडली आहे.

Vishal Gangurde

Bengaluru Suitcase News : कर्नाटकाची राजधानी बेंगळुरुमध्ये पुन्हा एकदा सुटकेस कांड उघकीस आलं आहे. बेंगळुरुत बुधवारी एका निळ्या रंगाच्या सुटकेसमध्ये तरुणीचा मृतदेह आढळला. या तरुणीची हत्या केल्यानंतर सुटकेसमध्ये मृतदेह भरून ट्रेनमधून फेकून दिल्याचा पोलिसांना संशय आहे. पोलिसांना ही निळी सुटकेस चंदपुराच्या पुलाजवळ आढळला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्राथमिक माहितीनुसार, तरुणीची हत्या करण्यात आली आहे. हत्या केल्यानंतर मृतदेह सुटकेसमध्ये भरून धावत्या ट्रेनमध्ये फेकला आहे. मृतदेहाजवळ तरुणीशी संबंधित कोणतेही पुरावे आढळले नाहीत. तरुणीशी संबंधित माहिती गोळा करण्याचे काम पोलीस पथकाने सुरु केले आहे. तरुणीचं नाव, वय आणि कोणत्या भागात राहणारी आहे, याविषयी माहिती घेणे पोलिसांकडून सुरु करण्यात आलं आहे.

पोलिसांनी या प्रकरणी एफआयआर नोंदवला आहे. तसेच मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला आहे. मुलीचे वय १८ वर्ष असल्याचं सांगितलं जात आहे. सकाळच्या सुमारास तरुणीचा मृतदेह आढळला. यानंतर स्थानिकांनी पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच सूर्यानगरमधील पोलिस तातडीने घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर घटनास्थळी पोहचून तपासाला सुरुवात केली.

पोलिसांकडून तपासाला सुरुवात

पोलिसांनी आजूबाजूच्या विभागातील बेपत्ता व्यक्तींच्या तक्रारीचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठण्यात आला आहे. शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानतंर तरुणीच्या मृत्यूचं कारण उघडकीस होणार आहे. रेल्वे ट्रॅकच्या आजूबाजूचे सीसीटीव्ही फुटेज गोळा करण्याचे काम पोलिसांनी सुरु केलं आहे.

तरुणीचा मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. तरुणीचा मृतदेह आढळल्याने पुन्हा एकदा महिला सुरक्षेचा प्रश्न उपस्थित झाला आहे. मृतदेह आढळलेल्या परिसरातील लोक भयभीत असून कठोर कारवाईची मागणी केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune News: पुण्यात फायनान्स कंपनीविरोधात शिंदेसेना आक्रमक, शेतकऱ्याच्या घराचं सील तोडलं

Train Accident: २ प्रवासी ट्रेनची एकमेकांना धडक, आतापर्यंत ४ प्रवाशांचा मृत्यू; ८८ जण गंभीर जखमी

Monday Horoscope: या राशींच्या आयुष्यात होणार मोठे बदल! कोणाला मिळणार पैशांचा लाभ? वाचा राशिभविष्य

Weight Loss Tips : वजन कमी करण्याचं सिक्रेट; 5 पदार्थ दररोजच्या आहारातून करा हद्दपार

Khan Saree Designs: महिलांसाठी खणाच्या साड्यांच्या लेटेस्ट डिझाईन्स, हे 5 पॅटर्न्स दिवाळीत दिसतील उठून

SCROLL FOR NEXT