Man Loses ₹1.86 Lakh in Shocking E-Commerce Scam Saam
देश विदेश

१.८६ लाखांचा मोबाईल ऑर्डर केला, बॉक्स उघडताच इंजिनिअरच्या पायाखालची जमीन सरकली ; पाहा VIDEO

Man Loses ₹1.86 Lakh in Shocking E-Commerce Scam: बंगळूरूतील इंजिनिअर तरूणाची ऑनलाइन फसवणूक झाली आहे. सॅमसंग मोबाईल ऑर्डर केला होता. त्याऐवजी बॉक्समध्ये टाइलचा तुकडा होता.

Bhagyashree Kamble

ऑनलाइन शॉपिंगमध्ये अनेकदा मोठी फसवणूक होते. बऱ्याच प्रकरणांमध्ये, लोक आगाऊ पैसे देऊन वस्तू ऑर्डर करतात. परंतु, डिलिव्हरी झाल्यानंतर वेगळी वस्तू मिळते. तर कधी कधी रिकामं खोकं मिळतं. अशीच एक घटना बंगळूरूमधून समोर आली आहे. एका माणसाची ऑनलाइन फसवणूक झाली आहे. त्या व्यक्तीची तब्बल १.८६ लाखांची फसवणूक झाली आहे.

बंगळूरूमधून एक धक्कादायक ऑनलाइन फसवणुकीचा प्रकार समोर आला आहे. शहरातील अभियंता प्रेमानंद यांनी सॅमसंग गॅलेक्सी झेड फोल्ड ७ हाय एंड मोबाईल ऑनलाइन ऑर्डर केला होता. हा मोबाईल फोन तब्बल १.८६ लाखांचा आहे. त्या तरूणानं एचडीएफसी कार्डद्वारे संपूर्ण रक्कम एकाचवेळी भरली होती.

डिलिव्हरीच्या दिवशी मोबाईल फोन घरपोच आला. प्रेमामंद या तरूणानं अनबॉक्सिंगचा व्हिडिओ शूट केला. मात्र, बॉक्स उघडल्यानंतर जे समोर दृश्य होतं, ते पाहून तरूणाला धक्का बसला. बॉक्सच्या आत फोन ऐवजी टाइलचा तुकडा होता. त्यानं व्हिडिओ शूट केला आणि सोशल मीडियावर शेअर केला.

या घटनेनंतर प्रेमानंद याने नॅशनल सायबर क्राइम रिपोर्टिंग पोर्टल आणि कुमारस्वामी लेआउट पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली. पोलिसांनी या प्रकरणी एफआयआर नोंदवला. तसेच फसवणूक करणाऱ्या आरोपीचा शोध सुरू केला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला असून, पोलिसांकडून तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime News : आई की कसाई? बॉयफ्रेंडसाठी एकुलत्या एक मुलाची हत्या, परिसरात खळबळ

रोमहर्षक अंतिम सामना! वर्षानुवर्षांच्या संघर्षानंतर दिल्लीचा ‘दबंग’ विजय; पुणेरी पलटनच्या संस्मरणीय हंगामाचा भावनिक शेवट

Powai Kidnapping Shock: पवईतील अपहरणाचा थरार, रोहितच्या एन्काऊंटरची इनसाईड स्टोरी

नेपाळ, बंगालनंतर आता 'या' देशातील सरकारविरोधात नागरिक उतरले रस्त्यावर; आंदोलनादरम्यान ७०० जणांचा मृत्यू

'सरकारने शेतकऱ्यांना पुन्हा फसवलं,कर्जमाफी आश्वासनावर जरांगेंची टीका

SCROLL FOR NEXT