Ola Saam Tv
देश विदेश

OLA कंपनीला कोर्टाचा दणका; कॅबमधील एसी बंद, ग्राहकाच्या तक्रारीमुळे मिळणार हजारो रुपयांची भरपाई

बंगळुरूमधील व्यावसायिकाने 80 किमी प्रवास करण्यासाठी ओला प्राइम सेडान बुक केली. त्यात एसी काम करत नव्हता.

प्रविण वाकचौरे

OLA Cab : ग्राहकांना त्यांचे हक्क माहिती असतील तर काय होऊ शकतं,याचं उत्तम उदाहरण कर्नाटकातील बंगळुरूमध्ये समोर आलं आहे. एका व्यक्तीने ओला कॅब कंपनीविरुद्ध तक्रार केल्यानंतर कोर्टाने कंपनीला 15 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. कॅबचा एसी काम करत नव्हता त्यायानंतरही प्रवाशाला कॅबचे भाडे द्यावे लागले होते.

घडलेला प्रकार असा आहे की, 18 ऑक्टोबर 2021 रोजी विकास भूषण या बंगळुरूमधील व्यावसायिकाने 80 किमी प्रवास करण्यासाठी ओला प्राइम सेडान बुक केली. त्यात एसी काम करत नव्हता. त्यानंतर त्याने प्रवासादरम्यानच तक्रार नोंदवण्याचा प्रयत्न केला पण त्याला अॅपमध्ये कोणताही पर्याय सापडला नाही. त्यानंतरही त्याला कॅबचे संपूर्ण भाडे द्यावे लागले.

राइड संपल्यानंतर व्यावसायिकाने ओलाच्या कस्टमर केअरशी बोलण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्यांना सांगण्यात आले की एसी देखील भाड्याचा भाग आहे. मात्र एसी काम करत नसल्याने व्यावसायिकाने पैसे रिफंड करण्याची मागणी केली. कॅब फर्मच्या प्रतिनिधींनी भूषण यांना सांगितले की रेट कार्डनुसार शुल्क घेतले गेले आहे आणि एसीसाठी कोणतेही अतिरिक्त शुल्क घेतले जात नाही.

त्यांतर तक्रारीच समाधान न झाल्याने ग्राहकाने ओलाचे सह-संस्थापक भाविश अग्रवाल यांना ईमेल केला आणि ट्विटरवर त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र दोन्ही प्लॅटफॉर्मवर प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर भूषण यांनी 11 नोव्हेंबर 2021 रोजी ओला मार्फत सेवेतील कमतरता निदर्शनास आणून दिली आणि परतावा मागण्यासाठी राष्ट्रीय ग्राहक हेल्पलाइनकडे तक्रार दाखल केली. ओलाने शेवटी ईमेलद्वारे कबूल केले की एसी सेवेमध्ये समाविष्ट आहे, परंतु परतावा देण्यास नकार दिला. त्याऐवजी कंपनीने ग्राहकांना 100 रुपयांचे कूपन ऑफर केले.

7 नोव्हेंबर 2022 रोजी न्यायालयाने ओलाच्या वकिलाने दाखल केलेली याचिका फेटाळून लावली. ओला ग्राहकांना दिलेल्या वचनानुसार सर्व सेवा देण्यास बांधील आहे. कॅब कंपनीने आठ तासांच्या संपूर्ण प्रवास कालावधीत एसी सेवा न दिल्याने ग्राहकांची गैरसोय आणि मानसिक त्रास होत आहे. सेवेतील कमतरता आणि चुकीच्या व्यवहारासाठी ओला दोषी आहे, असं न्यायालयाने म्हटलं.

18 जानेवारी 2023 रोजी दिलेल्या निकालात न्यायालयाने म्हटले आहे की, भाविश अग्रवाल यांना गैरसोय आणि मानसिक त्रासासाठी ग्राहकाला 10,000 रुपयांची भरपाई द्यावी लागेल'. तसेच तक्रारदाराला 1,837 रुपयांचे प्रवास भाडे व्याजासह 5000 रुपये 60 दिवसांच्या आत परत करण्याचे निर्देश दिले.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shukra Gochar 2024: नोव्हेंबर अखेरीस शुक्राचं नक्षत्र गोचर वाढवणार डोकेदुखी; आर्थिक हानी होण्याचा धोका

Air Pollution : राजधानीची हवा अत्यंत विषारी! शाळा बंद, वाहनांना बंदी, दिल्लीमध्ये अनेक निर्बंध

Weather Update : थंडीची चाहूल, कमाल अन् किमान तापमानात घट

Assembly Election: साकोलीचं महाभारत ! जातीय समीकरण कुणाच्या पथ्यावर? पटोलेंपुढे अविनाश ब्राह्मणकरांचं आव्हान

Horoscope Today : काहींना नको असलेल्या गोष्टींचा होईल त्रास, तर कोणाचे शत्रू काढतील डोके वर, वाचा तुमचे आजचे राशिभविष्य

SCROLL FOR NEXT