Crime News Saam TV
देश विदेश

Crime News : पत्नीला बॉयफ्रेंडसोबत नको त्या अवस्थेत बघितलं; पतीसोबत घडलं भयंकर

पत्नी आणि तिच्या प्रियकराने पतीची निर्घृणपणे हत्या केली. इतकंच नाही, तर पत्नीने पतीचा प्रायव्हेट पार्टही कापला.

साम टिव्ही ब्युरो

बेंगळुरू : कर्नाटकातील बंगळुरू शहरातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली. पतीने पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं. त्यानंतर झालेल्या वादातून पत्नी आणि तिच्या प्रियकराने पतीची निर्घृणपणे हत्या केली. इतकंच नाही, तर पत्नीने पतीचा प्रायव्हेट पार्टही कापला. त्यानंतर मृतदेह (Crime News) एका इमारतीच्या छतावर फेकून दिला. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी पत्नीसह तिच्या प्रियकराला बेड्या ठोकल्या आहेत.

चंद्रशेखर (वय 39) असं हत्या झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. श्वेता (वय 33) आणि तिचा प्रियकर सुरेश (वय 25) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी (Police) दिलेल्या माहितीनुसार, मृत चंद्रशेखर हा व्यवसायाने विणकर असून 21 ऑक्टोबर रोजी त्याचा मृतदेह येलहंका येथील कोंडाप्पा ले-आऊटमधील इमारतीच्या छतावर आढळून आला होता.

चंद्रशेखर याचा प्रायव्हेट पार्ट गायब असल्याने ही हत्या असावी, असा संशय पोलिसांना होता. याप्रकरणात पोलिसांनी चंद्रशेखरची पत्नी श्वेता हिची चौकशी केली. आपल्यापाठीमागे लागलेल्या एका व्यक्तीनेच चंद्रशेखर यांची हत्या केली, असा बनाव श्वेताने पोलिसांसमोर रचला. मात्र, पोलिसांना वेगळाच संशय होता.

संशयावरून पोलिसांनी श्वेताचा मोबाईल तपासला असता पतीच्या हत्येत तिचाच सहभाग असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी श्वेताची कसून चौकशी केली असता, आपणच प्रियकरासोबत पती चंद्रशेखरची हत्या केली असल्याची कबूली तिने दिली. याप्रकरणी पोलिसांनी श्वेतासह तिचा प्रियकर सुरेशला ताब्यात घेतलं आहे.

33 वर्षीय श्वेताचे 25 वर्षीय सुरेशसोबत अनैतिक संबध होते. पती चंद्रशेखर कामावर गेल्यानंतर श्वेता सुरेशला घरी बोलावून नको ते कृत्य करत होती. श्वेताचे वागणे, बोलणे बदलल्याने पती चंद्रशेखरला तिच्यावर संशय आला. एकेदिवशी चंद्रशेखर हा कामावरून लवकर घरी परतला. तेव्हा त्याने श्वेताला प्रियकर सुरेशसोबत नको त्या अवस्थेत बघितलं.

पत्नीला प्रियकरासोबत पाहून चंद्रशेखरला संताप अनावर झाला. त्यानंतर त्याने श्वेताला मारहाण करण्यास सुरूवात केली. झालेल्या वादातून श्वेताने प्रियकर सुरेशसोबत पती चंद्रशेखची हत्या केली. इतकंच नाही तर त्याचा प्रायव्हेट पार्टदेखील कापला. त्यानंतर मृतदेह एका इमारतीच्या छतावर फेकून आपला पाठलाग करणाऱ्या व्यक्तीनेच ही हत्या केल्याचा जबाब पोलिसांना दिला. मात्र, पोलीस चौकशीत श्वेताचं बिंग फुटलं.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

8th Pay Commission: १४.३% वाढ की १४०% पगारवाढ? ₹६९ हजार पगाराचा आकडा चर्चेत कसा आला? जाणून घ्या...

Maharashtra News Live Update: CJP नेते सौरव दास आणि आशुतोष रांका प्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयाचा सवाल; तातडीच्या सुनावणीवर प्रश्नचिन्ह

Mangalsutra Designs: महिलांसाठी मॉडर्न मंगळसूत्राचे लेटेस्ट पॅटर्न, ५ डिझाईन्स आहेत ट्रेंडमध्ये

Gold Price Today: जळगावच्या सुवर्ण बाजारासाठी दसरा ठरला निरस; सोन्याचे भाव घसरूनही उलाढालीत १५ टक्क्यांची घट; आजचे दर किती?

MHT-CET Exam 2027 : विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! MHT CET ची परीक्षा कधी होणार? सीईटी सेलची महत्त्वाची माहिती

SCROLL FOR NEXT