BELGIUM BUILDING FIRE: MULTIPLE FEARED DEAD AFTER BLAZE IN 10-STOREY RESIDENTIAL TOWER saam tv
देश विदेश

Building Fire: २०० रहिवाशी असलेल्या १० मजली इमारतीला भीषण आग; अनेकांचा होरपळून मृत्यू

Belgium 10-Storey Residential Tower Fire: दहा मजली इमारत आगीच्या भक्ष्यस्थानी पडली आहे. ही आग आठव्या मजल्यावर लागली होती. या इमारतीत सुमारे २०० लोक राहत होते.

Bharat Jadhav

  • बेल्जियममधील अँटवर्प शहरातील १० मजली निवासी इमारतीत भीषण आग लागली.

  • आग आठव्या मजल्यावर लागल्याची माहिती असून इमारतीत सुमारे २०० रहिवासी होते.

  • घटनेत अनेकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली असून अधिकृत आकडेवारीची प्रतीक्षा

बेल्जियममधील अँटवर्प शहरातील एका १०-मजली ​​निवासी इमारतीत भीषण आग लागली आहे. या घटनेत अनेकांचा मृत्यू झाल्याचं वृत्त आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, स्थानिक वेळेनुसार सकाळी ९:५३ वाजता अग्निशमन दलाला अँटवर्पच्या 'लिंकेरोव्हर' (Linkeroever) भागातील एका इमारतीच्या आठव्या मजल्यावर भीषण आग लागल्याची माहिती फोन कॉलवरून मिळाली होती.

या दुर्घटनेप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आगीच्या भक्षस्थानी पडलेल्या इमारतीत २०० हुन अधिक जण राहत होते. इमारतीला आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी इमारतीमधील रहिवाशांना बाहेर सुरक्षितस्थळी नेलं आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आगीच होरपळून अनेकांचा मृत्यू झाला आहे. परंतु मृतांचा आकडा किती आहे, याचा खुलासा अद्याप करण्यात आला नाहीये.

आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. बचाव पथके अजूनही इमारतीच्या आत आहेत. आत नेमके किती लोक अडकलेत याचा आकडा समोर आला नाहीये. अधिकाऱ्यांनी मृतांची किंवा जखमींची नेमकी संख्या अद्याप जाहीर केलेली नाही. दुपारी १२ च्या सुमारास अग्निशमन दलाच्या जवानांनी माहिती दिली की, आग अजूनही नियंत्रणात आलेली नाही.

अग्निशमन दलाच्या प्रवक्त्या मेरी डी क्लर्क म्हणाल्या, "आग अजून विझलेली नाही आणि ती नियंत्रणातही आलेली नाही. आगीचे कारण शोधण्यासाठी तपास सुरू आहे." या घटनेची अत्यंत गांभीर्याने दखल घेत आपत्कालीन अधिकाऱ्यांनी वैद्यकीय मदत व्यवस्था कार्यान्वित केली आहे. आग नियंत्रणात आणण्यासाठी आणि बचावकार्य राबवण्यासाठी स्थानिक अग्निशमन दलाच्या जवानांना मदत करण्याकरिता वासलँड (Waasland), केम्पेन (Kempen), रँड आणि रिव्हिरनँड (Rivierenland) यांसारख्या शेजारील भागांतील अग्निशमन पथके तैनात करण्यात आल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jantar Mantar Protest: जंतरमंतरवर पुन्हा परिस्थिती बिघडली; विद्यार्थ्यांवर पुन्हा लाठीचार्ज, पोलिसांवर दगड, बाटल्या फेकल्या

नागपुरात धक्कादायक घटना! दुपारी सुट्टीच्या वेळी चक्कर आली; उपचारादरम्यान तिसरीच्या विद्यार्थ्याचा मृत्यू

Schools Closed: पालघर जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालय आणि अंगणवाड्यांना उद्या सुट्टी,काय आहे कारण जाणून घ्या

दिल्लीतील आंदोलनात मराठा एल्गार, पुन्हा हल्ला केल्यास सरकारचा माज उतरवणार

दिल्लीत शरद पवार-पंतप्रधान मोदींची भेट भेटीमागे नेमकं गुपित काय?

SCROLL FOR NEXT