देश विदेश

Stampede: भाजप महापौराच्या रक्षाबंधन कार्यक्रमात चेंगराचेंगरी; एका महिलेचा मृत्यू, अनेक गंभीर

Raksha Bandhan Stampede: उत्तर प्रदेशातील बरेली येथे भाजप महापौरांच्या रक्षाबंधन कार्यक्रमात मोठी चेंगराचेंगरी झाली. २० हजार महिलांच्या गर्दीत झालेल्या दुर्घटनेत ४५ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला असून अनेक महिला गंभीर जखमी झाल्या आहेत.

Namdeo Kumbhar

Bareilly Raksha Bandhan event stampede latest news : उत्तर प्रदेशातील बरेली येथे भाजपच्या महापौरांनी आयोजित केलेल्या रक्षाबंधन कार्यक्रमात चेंगराचेंगरीची दुर्दैवी घटना घडली. मोफत भेटवस्तू आणि जेवणाचे आश्वासन देऊन बोलावलेल्या तब्बल २० हजार महिलांच्या गर्दीवर नियंत्रण न मिळवता आल्याने अचानक चेंगराचेंगरी झाली. या दुर्घटनेत एका ४५ वर्षीय महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर इतर अनेक महिला गंभीर जखमी झाल्या आहेत.

'पार्थ गौतम फाऊंडेशन' आणि 'युवा सेवक संघ'तर्फे आयोजित या कार्यक्रमात साड्या आणि भेटवस्तूंचे वाटप सुरू असताना व्यासपीठाजवळ महिलांची प्रचंड ढकलाढकली झाली. आयोजकांचे गर्दीवर कोणतेही नियंत्रण नसल्याने अनेक महिला आणि लहान मुले पायदळी तुडवले गेले. या दुर्घटनेमुळे आनंदाच्या सणावर शोककळा पसरली आहे. सुरक्षेच्या अभावावरून स्थानिक नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

भाजपचे महापौर डॉ. उमेश गौतम आणि त्यांच्या मुलाने रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर महिलांचा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात मोफत भेटवस्तू (गिफ्ट्स) आणि जेवणाचे आश्वासन देऊन २० हजार महिलांना आमंत्रित करण्यात आल्याची माहिती आहे. पण भेटवस्तू मिळवण्याच्या घाईत अचानक तुफान चेंगराचेंगरी झाली. या दुर्दैवी घटनेत ४५ वर्षीय मधु यांचा मृत झाला. गर्दीमुळे अनेक महिला आणि लहान मुले गुदमरून खाली पडले होते, तर काहींचे दागिने आणि मोबाईल चोरीला गेल्याचेही समोर आले आहे.

एवढ्या मोठ्या प्रमाणावर महिलांना बोलावूनही सुरक्षेची आणि गर्दी नियोजनाची कोणतीही योग्य व्यवस्था केली नव्हती, असा गंभीर आरोप मृत महिलेच्या कुटुंबीयांनी केला आहे. गेल्या वर्षी रक्षाबंधनाच्या या कार्यक्रमाला १५ हजार महिला आल्या होत्या. त्यामुळे यंदा २० हजार महिलांना आमंत्रण देण्यात आले होते. सोबत पुरुष आणि लहान मुले आल्याने गर्दीचा आकडा आणखी वाढला. दुपारी ३ वाजेच्या सुमारास भेटवस्तू आणि साड्या वाटप सुरू असताना व्यासपीठाजवळ अचानक महिलांची प्रचंड ढकलाढकली सुरू झाली. आयोजकांनी शांततेचे आवाहन केले, परंतु गर्दी हाताबाहेर गेली अन् चेंगराचेंगरी झाल्याचे सांगण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Truck Fire: राष्ट्रीय महामार्गावर धावत्या खाद्यतेलाच्या ट्रकला भीषण आग, वाहतूक विस्कळीत

जिंकलात तर यंत्रणा प्रामाणिक अन् हरलात तर फेरफार कशी? निवडणूक आयोगाच्या समर्थनार्थ १२४ IAS अधिकारी मैदानात

Blood Sugar Control Tips: ब्लड शुगर कमी करण्यासाठी दररोज किती वेळ चालावे? जाणून घ्या नियमित चालण्याचे सोपे नियम

Bay Leaf Water For Kidney Stones: किडनी स्टोनवर तेजपत्याच्या पाण्याचा घरगुती उपाय, एकदा नक्की करून पाहा

Saree Designs: महिलांनी नऊरात्रीत नेसा 9 प्रकारच्या 9 साड्या, लेटेस्ट डिझाईन्स पाहा

SCROLL FOR NEXT