baramulla blast Saam tv
देश विदेश

baramulla blast : कोर्टाच्या आवारात फुटला ग्रेनेड बॉम्ब; परिसरात उडाली एकच खळबळ, नागरिकांची धावाधाव

baramulla blast Update : बारामुल्ला येथील कोर्टाच्या आवारात ग्रेनेड बॉम्ब फुटल्याची घटना घडली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली.

Vishal Gangurde

jammu and kashmir : जम्मू-काश्मीरच्या बारामूला या भागात ग्रेनेड बॉम्बचा स्फोट झाल्याची घटना घडली आहे. हा स्फोट मलखाना कोर्ट परिसरात झाली आहे. या घटनेत एक पोलीस कर्मचारी जखमी झाला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, ग्रेनेड बॉम्ब चुकून फुटल्याचं बोललं जात आहे. सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे.

जम्मू-काश्मीर दुर्घटमा घटना घडण्याआधी दहशतवाद्यांनी उत्तर प्रदेशच्या मजुरावर गोळीबार केला होता. या घटनेत मजूर जखमी झाला होता. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनूसार, बिजनौरमध्ये राहणाऱ्या शुभम कुमारला बटागुंड गावात दहशतवाद्यांनी गोळी मारली होती. शुभम कुमारच्या हाताला गोळी लागली. त्यानंतर शुभम कुमारला तातडीने रुग्णालयात नेण्यात आलं. एका आठवड्यात तिसऱ्या मजुरावर गोळीबार झाल्याची घटना घडली आहे.

गांदरबल जिल्ह्यातील एक गावात रविवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सहा प्रवासी मजूर जखमी झाले होते. तर एका स्थानिक चिकित्सकाचा मृत्यू झाला होता. तर १८ ऑक्टोबर रोजी शोपिया जिल्ह्यातील दहशतवादी हल्ल्यात बिहारच्या मजुराची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती.

जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी गांदरबल येथे जीव गमावणाऱ्या डॉ. शाहनवाज डार यांच्या घरी भेट दिली होती. तसेच मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या कुटुंबातील एका सदस्याला सरकारी नोकरी देण्याची घोषणा केली. मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली की, डॉक्टर शाहनवाज यांच्या मुलाचा स्पर्धा परिक्षा आणि प्रशिक्षणाचा खर्च सांभाळण्याची घोषणा केली आहे. अब्दुल्ला यांनी डॉ. डार यांच्या कुटुंबाप्रति संवेदना व्यक्त केली. यासाठी ते बडगामच्या नाईदगाम गावात गेले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Delhi Pune Flight : दिल्ली - पुणे विमानात भयंकर घडलं! प्रवाशांची घुसमट झाली, घाम फुटला अन्...

Sleeping : पावसाळ्यात रात्री डोक्यावरून पांघरूण घेऊन झोपताय? सावधान! शरीरावर होतायेत 'हे' गंभीर परिणाम

Maharashtra News Live Update : धोकादायक आंबा घाटातून एसटी वाहतूकही बंद

Petrol and Diesel Prices : पेट्रोल-डिझेल अचानक महागले; या राज्य सरकारने लावला 'विशेष सेस', नवी दरवाढ लागू

Tea Affect On Digestion System: चहा प्यायल्याने पचनक्रियेवर काय परिणाम होतो? जाणून घ्या ‘हे’ 5 महत्त्वाचे फायदे- तोटे

SCROLL FOR NEXT