बॉयफ्रेंडच्या घरी गेलेल्या विवाहित महिलेची हत्या, तरुणाचे आई-वडील आणि चार बहिणी फरार Saam tv
देश विदेश

१ महिन्यापूर्वीच बॉयफ्रेंडचं लग्न, बायको माहेरी गेली; रात्री विवाहित महिला घरी आली, सकाळी आढळला मृतदेह

Girlfriend Killed in Barabanki : महिनाभरापूर्वी लग्न झालेल्या तरुणाच्या घरातच एका विवाहित महिलेचा मृतदेह आढळला. अनैतिक संबंधांतून तिची हत्या झाल्याचा संशय आहे. उत्तर प्रदेशच्या बाराबंकी जिल्ह्यात ही घटना घडली.

Nandkumar Joshi

barabanki crime news : महिनाभरापूर्वी लग्न झालेल्या बॉयफ्रेंडच्या घरी आलेल्या विवाहित महिलेची हत्या झाली. उत्तर प्रदेशच्या बाराबंकी जिल्ह्यात ही धक्कादायक घटना घडली. या हत्याकांडात बॉयफ्रेंडचे आईवडील आणि बहिणी सामील असू शकतात, असा संशय पोलिसांना आहे. तरुणाच्या कुटुंबातील सर्व सदस्य सध्या फरार आहेत. त्यांचा शोध घेण्यात येत आहे.

उत्तर प्रदेशातील बाराबंकी जिल्ह्यातील शहावपूरमध्ये ३१ वर्षीय विवाहित महिलेची हत्या करण्यात आली. तिच्याच कथित बॉयफ्रेंडच्या घरात तिचा मृतदेह आढळला. मृतदेहाशेजारी कुऱ्हाड सापडली आहे. याबाबत पोलिसांनी मंगळवारी माहिती दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहावपूरचा रहिवासी संदीप याचं महिनाभरापूर्वी लग्न झालं होतं. त्याचे गोरखपूरच्या एका विवाहित महिलेसोबत प्रेमसंबंध होते.

ही विवाहित महिला सोमवारी रात्री संदीपच्या घरी आली होती. त्यावेळी संदीपचे आई-वडील आणि बहिणी घरी होत्या. तर त्याची पत्नी तिच्या माहेरी गेली होती. सकाळी सहा वाजताच्या सुमारास संदीप हा शौचासाठी घराबाहेर गेला होता. तेव्हा घरात सगळं काही आलबेल होतं. पण तो शौचाहून घरी परत आला त्यावेळी ममताचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. बाजूलाच कुऱ्हाड पडली होती.

पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, प्रेयसी ममताचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात बघितल्यानंतर संदीप हादरून गेला. याबाबत त्यानं तात्काळ पोलिसांना माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांचं पथक संदीपच्या घरी पोहोचलं. त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा करून सर्व पुरावे गोळा केले. ममताची हत्या आई-वडिलांनी केल्याचा आरोप स्वतः संदीपने केला आहे.

या घटनेनंतर संदीपचे आई-वडील आणि चार बहिणी फरार झाल्या आहेत. ममताचा मृतदेह विच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. पोलिसांनी सांगितले की, ममताच्या हत्येबाबतची माहिती तिच्या कुटुंबीयांना दिली आहे. या घटनेचा तपास करण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monday Horoscope : नशिबाची साथ मिळेल! 5 राशींच्या व्यक्तींची होणार चांदी, वाचा सोमवारचे राशीभविष्य

Chanakya Niti : खूप मोठं व्हायचंय? चाणक्यांची ही खास नीती लक्षात ठेवा, सर्व इच्छा होतील पूर्ण

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

SCROLL FOR NEXT