Maharashtra Bank Holidays Saam Tv
देश विदेश

Bank Holidays: उद्यापासून सलग 6 दिवस बँका राहणार बंद, कोणत्या राज्यात कधी आहे सुट्टी? जाणून घ्या

Maharashtra Bank Holidays: उद्यापासून सलग 6 दिवस बँका राहणार बंद, कोणत्या राज्यात कधी आहे सुट्टी? जाणून घ्या

Satish Kengar

Maharashtra Bank Holidays:

जर तुम्ही पुढील 7 दिवसांत बँकिंगशी संबंधित काम करण्यासाठी शाखेत जाण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. उद्या म्हणजेच 10 नोव्हेंबर ते 15 नोव्हेंबरपर्यंत काही राज्यांमध्ये विविध कारणांमुळे एकूण 6 दिवस बँका बंद राहणार आहेत. अशातच शाखेत जाण्यापूर्वी बँकेच्या सुट्ट्यांची यादी तपासणे गरजेचे आहे. यातच आपण जाणून घेणार आहोत, कोणत्या राज्यात कधी बँक बंद राहणार आहे.

कोणत्या दिवशी बँक राहणार बंद?

10 नोव्हेंबर : या दिवशी शुक्रवार आहे. रिझर्व्ह बँकेच्या सुट्टीच्या यादीनुसार मेघालयमध्ये या दिवशी वंगाळा महोत्सवामुळे बँका बंद राहणार आहेत. देशातील इतर राज्यातील कामावर कोणताही परिणाम होणार नाही. धनत्रयोदशी देखील 10 नोव्हेंबरला आहे. मात्र, यानिमित्ताने बँकांना सुट्टी नाही. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

11 नोव्हेंबर: या दिवशी महिन्याचा दुसरा शनिवारी येतो. रिझर्व्ह बँकेच्या म्हणण्यानुसार महिन्याचा दुसरा आणि चौथा शनिवारी साप्ताहिक सुट्टी असते. अशा परिस्थितीत 11 नोव्हेंबर रोजी बँका बंद राहणार आहेत.  (Latest Marathi News)

12 नोव्हेंबर: ही तारीख रविवार आहे, जी साप्ताहिक सुट्टी आहे. अशा परिस्थितीत बँका बंद राहतील. म्हणजे रविवार असल्याने बँकांमध्ये दिवाळीची अतिरिक्त सुट्टी नाही.

13 नोव्हेंबर: या दिवशी समोवार आहे. या दिवशी गोवर्धन पूजा/लक्ष्मी पूजनामुळे देशातील काही राज्यांमध्ये बँका बंद राहतील. ज्या राज्यांमध्ये बँका बंद राहणार आहेत त्यात महाराष्ट्र , उत्तराखंड, सिक्कीम, मणिपूर, राजस्थान, उत्तर प्रदेश आणि त्रिपुरा यांचा समावेश आहे.

14 नोव्हेंबर: या दिवशी मंगळवार आहे. या दिवशी दिवाळी (बली प्रतिपदा) / विक्रम संवत नववर्ष / लक्ष्मी पूजनामुळे देशातील अनेक राज्यांमध्ये बँका बंद राहतील. ज्या राज्यांमध्ये बँका बंद राहणार आहेत त्यात महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक आणि सिक्कीमचा समावेश आहे.

15 नोव्हेंबर: ही तारीख बुधवारी येत आहे. या दिवशी भाऊबीज हा सण साजरा केला जाईल. त्यामुळे सिक्कीम, मणिपूर, उत्तर प्रदेश, बंगाल आणि हिमाचल प्रदेशात बँका बंद राहतील.

बँक सुट्ट्यांची यादी तपासण्यासाठी, तुम्ही रिझर्व्ह बँकेच्या अधिकृत लिंकला भेट देऊ शकता. https://rbi.org.in/Scripts/HolidayMatrixDisplay.aspx

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sukanya Samriddhi Yojana: ₹1.5 लाख गुंतवा अन् ₹71.82 लाख मिळवा! जाणून घ्या कन्या सुकन्या समृद्धी योजनेचे गणित

Maharashtra News Live Update: कल्याणमध्ये व्हीएलसीसी संस्थेविरोधात मनसेचे ठिय्या आंदोलन

Nitin Gadkari : नितीन गडकरी राजकारणातून निवृत्त होणार का? कालच्या त्या वक्तव्यावर थेट ऑफिसमधून स्पष्टीकरण

पूर्ण फी भरली, तरी प्रशिक्षण नाही! VLCC विरोधात मनसेचा धडक मोर्चा

BJP News: भाजपमधील अंतर्गत गटबाजी उफाळली; तावडेंना मुंबई अध्यक्षांनी थेट सुनावलं, नगरसेवकांनाही आरसा दाखवला

SCROLL FOR NEXT