Bank Of Badoda Saam Tv
देश विदेश

बँक ऑफ बडोदा बँकेच्या ग्राहकांना झटका! आता अधिक भरावा लागणार EMI

भारतीय रिझर्व्ह बँकेने गेल्या आठवड्यात रेपो दरात ०.५० टक्क्यांनी वाढ केली आहे.

साम वृत्तसंथा

नवी दिल्ली: भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) गेल्या आठवड्यात रेपो दरात ०.५० टक्क्यांनी वाढ केली आहे. यानंतर अनेक बँकांनी आपले व्याजदर वाढवले ​​असून आता या यादीत एका मोठ्या बँकेचे नाव पुढे आले आहे. बँक ऑफ बडोदाने आपल्या ग्राहकांना मोठा धक्का दिला आहे. बँकेने विविध मुदतीच्या कर्जासाठी मार्जिनल कॉस्ट बेस्ड लेंडिंग रेट (MCLR) मध्ये ०.२० टक्क्यांपर्यंत वाढ करण्याची घोषणा केली आहे.

बँक ऑफ बडोदाने एमसीएलआर दरात वाढ करण्यास मान्यता दिली आहे. हे १२ ऑगस्टपासून लागू होणार आहे. एक वर्षाचा बेंचमार्क एमसीएलआर ७.६५ टक्क्यांवरून ७.७० टक्के करण्यात आला आहे. बहुतांश ग्राहक कर्जांचे व्याजदर याच आधारावर निश्चित केले जातात.

एक महिन्याच्या मुदतीच्या कर्जासाठी MCLR ०.२० टक्क्यांनी वाढवून ७.४० टक्के करण्यात आला आहे. तीन महिने आणि सहा महिन्यांच्या कर्जासाठी MCLR ०.१० टक्क्यांनी वाढवून अनुक्रमे ७.४५ आणि ७.५५ टक्के करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

MCLR वाढल्याने मुदत कर्जावरील EMI वाढण्याची शक्यता आहे. बहुतांश ग्राहक कर्जे किरकोळ किमतीवर आधारित कर्जदरावर आधारित असतात. MCLR वाढल्यामुळे वैयक्तिक कर्ज, वाहन आणि गृह कर्ज महाग होऊ शकते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

October Heat : 'ऑक्टोबर हीट'चा तडाखा! मुंबई-कोकणाला उष्णतेचा येलो अलर्ट, तुमच्या शहरात काय स्थिती?

Maharashtra News Live Update : ई पीक पाहणीत 'हापूस'ला स्वतंत्र ओळख द्या रत्नागिरीतील शेतकऱ्यांची मागणी

Shiv Sena UBT : ठाकरे गटाच्या आक्रमक नेत्यावर कारवाई, उपनेता वर्षभरासाठी थेट येरवडा जेलमध्ये, राज्यात मोठी खळबळ

Heart Health : छातीत दुखण्याव्यतिरिक्त शरीरात 'ही' ६ लक्षणे दिसल्यास सावधान!

Monday Horoscope : सावध राहा! 6 राशींच्या आयुष्यात येणार मोठा बदल; पैसा, करिअर अन् नात्यांमध्ये काय घडणार?

SCROLL FOR NEXT