Bank Holiday At 21 October Saam Tv
देश विदेश

Bank Holiday: बुधवारी बँका राहणार बंद, RBI ने सुट्टी का केली जाहीर?

Bank Holiday At 21 October: २१ ऑक्टोबर रोजी बँका बंद राहणार आहेत. आरबीआयने कोणत्या राज्यातील बँकांना सुट्टी असणार आहे हे जाहीर केले आहे.

Priya More
  • बुधवारी देशातील अनेक राज्यातील बँका बंद राहणार आहेत

  • विजयादशमी आणि दुर्गापूजानिमित्ता बँकांना सुट्टी

  • बंगळुरू, गंगटोक, गुवाहाटी, कोची, कोलकाता आणि तिरुवनंतपुरम येथे बँक बंद राहणार आहेत

बुधवारी म्हणजे २१ ऑक्टोबर रोजी जर तुम्ही बँकेत काही काम करण्यासाठी जाण्याचा प्लान करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. कारण बुधवारी बँका बंद राहणार आहेत. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या कॅलेंरनुसार, काही राज्यांमध्ये बुधवारी बँका बंद राहणार आहेत. त्यामुळे तुम्ही जर बँकेत जाण्याचा विचार करणार असाल तर तुम्हाला माहिती असणे गरजेचे आहे. आरबीआयने बुधवारी बँकांना सुट्टी का दिली हे आपण जाणून घेणार आहोत...

मंगळवार म्हणजे आज २० नोव्हेंबर रोजी दसऱ्यामुळे अनेक राज्यांमध्ये बँकांना सुट्टी आहे. आरबीआयने जारी केलेल्या सुट्ट्यांच्या यादीनुसार, आसाम, कर्नाटक, केरळ, सिक्कीम, त्रिपुरा आणि पश्चिम बंगालमध्ये विजयादशमी आणि दुर्गा पूजेमुळे बुधवार २१ ऑक्टोबर रोजी बँका बंद राहणार आहेत. स्टेट बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक, बँक ऑफ बडोदा, कॅनरा बँक, अॅक्सिस बँक, एचडीएफसी बँक आणि आयसीआयसीआय बँक यासह सर्व सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रातील बँका या राज्यांमध्ये बुधवारी बंद राहणार आहेत.

दसरा आणि विजयादशमी हा हिंदू धर्मातील प्रमुख सणांपैकी एक आहे. हा सण वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक आहे. धार्मिक श्रद्धेनुसार याच दिवशी भगवान रामाने रावणाचा वध केला होता. या निमित्ताने देशभरात रावणाचे दहन केले जाते. काही राज्यांमध्ये विजयादशमी हा सण देवी दुर्गामातेचा महिषासुरावरील विजय म्हणूनही साजरा केला जातो. या सणामुळे आसाम, कर्नाटक, केरळ आणि सिक्कीमसह अनेक राज्यांमध्ये बँका बंद राहणार आहेत.

दुर्गा पूजा हा देवीच्या पूजेसाठी समर्पित एक प्रमुख सण आहे. हा सण विशेषतः पश्चिम बंगाल, त्रिपुरा आणि आसाममध्ये मोठ्या थाटामाटात आणि उत्साहात साजरा केला जातो. ज्याप्रमाणे महाराष्ट्रात गणेशोत्सव सण साजरा केला जातो तसं या राज्यांमध्ये दुर्गापूजा हा सण साजरा केला जातो.

आज कुठे बँका बंद आणि कुठे सुरू?

दसरा, विजयादशमी, महानवमी, आयुधा पूजा आणि दुर्गापूजा यानिमित्ताने आज बँका बंद आहेत. दिल्ली, उत्तर प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेश, आसाम, बिहार, झारखंड, कर्नाटक, मेघालय, मिझोराम, नागालँड, ओडिशा, तामिळनाडू, त्रिपुरा, पश्चिम बंगाल आणि अरुणाचल प्रदेशमध्ये बँका बंद राहणार आहेत. सिक्कीम आणि मणिपूरमध्ये आज बँका सुरू आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Actor Death: प्रसिद्ध अभिनेत्याचे ३२ व्या वर्षी निधन, सिनेसृष्टीवर शोककळा

५०० रुपयांचा चष्मा घातल्याशिवाय दिसत नाहीत; अंबरनाथचे तहसीलदार म्हणजे ‘मिस्टर इंडिया, बैलगाडीसह थेट कार्यालयात धडक

Tea : गरमागरम चहा पिण्याची सवय पडेल महागात, ३ दुष्परिणाम वाचून चहा पिणेच सोडाल

Best fridge temperature: ऑक्टोबरच्या उकाड्यात फ्रिजचं तापमान किती डिग्रीवर ठेवावं?

Tax Audit Deadline : २४ तासांत हे काम कराच, नाहीतर बसणार मोठा भुर्दंड; इन्कम टॅक्स विभागाचा अखेरचा इशारा

SCROLL FOR NEXT