shahabuddin resignation social media
देश विदेश

shahabuddin resignation : एक कथित कॉल आणि राष्ट्रपतींचा तडकाफडकी राजीनामा; बांगलादेशच्या राजकारणात खळबळ

bangladesh president shahabuddin resigns : एका कथित फोन कॉलमुळे बांगलादेशच्या राजकीय वर्तुळात मोठी उलथापालथ झाली. शहाबुद्दीन यांनी राष्ट्रपतिपदाचा राजीनामा दिला. शहाबुद्दीन यांनी शेख हसिना यांना कॉल केला होता, असे सांगितले जाते.

Nandkumar Joshi

बांगलादेशचे राष्ट्रपती मोहम्मद शहाबुद्दीन यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. शेख हसिना यांच्याशी लंडनच्या दौऱ्यावर असताना संपर्क साधण्याचा प्रयत्न केल्यामुळे शहाबुद्दीन हे वादात सापडले होते. रिपोर्टनुसार, बांगलादेशमध्ये सत्तापरिवर्तन झाल्यानंतर शेख हसिना यांनी देश सोडला होता. प्रकृतीच्या कारणास्तव लंडनच्या दौऱ्यावर गेलेले शहाबुद्दीन यांनी शेख हसिना यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर बांगलादेशच्या राजकारणात खळबळ माजली होती. शहाबुद्दीन हे वादात सापडले होते. राजकीय निष्ठेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते.

बांगलादेशात सध्या बीएनपीचे सरकार आहे. माजी पंतप्रधान खालिदा जिया यांचे पुत्र तारिक रहमान हे पंतप्रधान आहेत. शेख हसिना आणि तारिक रहमान हे बांगलादेशच्या राजकारणातील कट्टर प्रतिस्पर्धी आहेत. अलिकडेच शेख हसिना यांनी बांगलादेशात परतण्याची घोषणा केली होती. सत्तापालट झाल्यानंतर शेख हसिना यांनी बांगलादेश सोडून भारतात आश्रय घेतला होता. डिसेंबर २०२६ मध्ये बांगलादेशात परतणार असल्याची घोषणा त्यांनी केली होती. मोहम्मद शहाबुद्दीन हे राजीनामा देऊ शकतात, अशी चर्चा बांगलादेशच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून सुरू होती.

या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून असणाऱ्या वरिष्ठ सूत्रांनी याबाबत संकेत दिले होते. शहाबुद्दीन हे राष्ट्रपतिपदावरून पायउतार होतील असे त्यांनी सांगितले होते. बंगभवनात वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत राष्ट्रपतिपद सोडण्याची तयारी त्यांनी दर्शवली होती. त्यांनी अवामी लीग सरकारच्या कार्यकाळात २४ एप्रिल २०२३ रोजी बांगलादेशच्या २२ वे राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली होती. त्यांचा कार्यकाळ २०२८ मध्ये संपुष्टात येणार होता. मात्र, कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच अवघ्या दोन वर्षांच्या आतच त्यांनी राजीनामा दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: यवतमाळच्या उमरखेडमध्ये स्फोटात दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू

Kalyan: लोकलमधून अचानक ट्रॅकवर पडली 24 वर्षीय तरुणी; रेल्वे पोलिसांनी वाचवले प्राण

Pitru Paksh 2026 : पितृ पक्षात काय खावे आणि काय खाऊ नये? जाणून घ्या

निवडणूक आयोगाचा SIR संदर्भात मोठा निर्णय; महाराष्ट्रासह दिल्लीत दावे, हरकतींसाठी मुदतवाढ

दुष्काळात बळीराजाला मोठा दिलासा! लग्नाचा खर्च उचलणार शिवसेना; शिंदेंनी थेट दिला 'हा' शब्द

SCROLL FOR NEXT