Bangladesh News Saam Tv Youtube
देश विदेश

Bangladesh मध्ये पुन्हा सत्तापालट? मोहम्मद युनूस यांची उलट गिनती सुरु? बांग्लादेशात येणार लष्करी राजवट?

Bangladesh News : बांग्लादेशात लष्कर विरुद्ध सरकार असा संघर्ष रंगलाय.. त्यामुळंच युनूस यांचा काऊंटडाऊन सुरु झाल्याचं म्हटलं जातंय.. मात्र खरंच बांग्लादेशमध्ये तख्तापालट होणार का? त्याची कारणं नेमकी काय आहेत? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून.....

Yash Shirke

भरत मोहळकर, साम टीव्ही, प्रतिनिधी

अंतर्गत यादवीनं बांग्लादेश बेचिराख झाला आणि लष्करानं शेख हसिनांची सत्ता उलथून टाकत मोहम्मद युनूस यांना काळजीवाहू पंतप्रधान बनवलं... मात्र अवघ्या नऊ महिन्यातच बांग्लादेशात पुन्हा असंतोषाची ठिणगी पडलीय.. कट्टरपंथीय पंतप्रधान मोहम्मद युनूस आणि लष्कर प्रमुख वकार उज जमान यांच्यात संघर्ष पेटलाय... त्यामुळं बांग्लादेशात पुन्हा एकदा सत्तापालटाचे वारे वाहू लागलेत..... तर लष्कर प्रमुखांनी थेट सैन्याची तातडीची बैठक बोलावलीय....त्याची नेमकी कारणं काय आहेत? पाहूयात...

- शेख हसीनांच्या राजीनाम्यानंतर बांग्लादेशात निवडणूक नाही

- लष्कर प्रमुखांकडून तातडीने निवडणूक घेण्याची मागणी

- युनूस यांच्या कमकुवत सरकारमुळे बांग्लादेशात परदेशी शक्तींचा हस्तक्षेप

- मोहम्मद युनूस विदेशी शक्तींच्या हातचे बाहुले बनल्याचा सेनेचा आरोप

स्वातंत्र्य सैनिकांच्या वारसांना देण्यात येणाऱ्या आरक्षणावरुन सुरु झालेलं आंदोलन बांग्लादेशात अंतर्गत यादवीपर्यंत पोहचलं.. त्यामुळेच शेख हसिनांना राजीनामा द्यावा लागला... तर त्यानंतर नोबेल पुरस्कार विजेते मोहम्मद युनूस यांना बांग्लादेशचं कार्यकारी पंतप्रधान बनवण्यात आलं.. मात्र कट्टरपंथीय मोहम्मद युनूस यांच्या काळात अल्पसंख्यांकावर होणारे अत्याचार, लष्करी सैन्यात फुटीची चर्चा यामुळे बांग्लादेशात पुन्हा यादवीची शक्यता निर्माण झालीय... एवढंच नाही तर निवडणूक न घेता युनूस यांनीही लष्करात फूटीची रणनीती आखलीय...

- लेफ्टनंट जनरल फैजूर रहमानसोबत गुप्त बैठक

- फैजूर रहमान यांना आर्मी चीफ बनवण्याची योजना

- निवडणूक पुढे ढकलण्याची युनूस यांची रणनीती

एकीकडे भारत आणि अमेरिकेसोबत बांग्लादेशचे संबंध बिघडण्याचा आरोप युनूस यांच्यावर आहे. तर दुसरीकडे बांग्लादेशमध्ये शेख हसिना आणि खालिद जिया यांच्या पक्षाला एकत्र आणत देशात निवडणूक घेण्याची लष्कराची मागणी आहे.. मात्र याच मागणीकडे मोहम्मद युनूस दुर्लक्ष करत आहेत.. त्यामुळे लष्कर प्रमुख वकार उज जमान यांनी बोलवलेली तातडीची बैठक युनूस यांच्यासाठी धोक्याची घंटा आहे का? आणि लष्कर प्रमुखांच्या संतापामुळं बांग्लादेशात पुन्हा सत्तापालट होणार का? याकडे जगाचं लक्ष लागलंय..

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Alibag Fishing Boat Capsizes: समुद्रात मच्छीमार बोट बुडाली; 5 खलाशांनी 9 तास पोहून गाठला किनारा, 3 जण बेपत्ता

Amravati Accident: चिखलदरा पर्यटन स्थळावर मोठा अपघात; ६०० फूट खोल दरीत कोसळली कार

Mahayuti Phone Taping: महायुतीच्या मंत्र्यांचेच फोन टॅप? रोहित पवारांच्या दाव्याने खळबळ

UPI Payment: फुकट UPI व्यवहार बंद होणार? प्रत्येक व्यवहारावर पैसे मोजावे लागणार?

PM Kisan: कधी मिळणार PM किसानचा हप्ता? 20 व्या हप्त्याची प्रतिक्षा कायम, कोणाला नाही मिळणार पैसा?

SCROLL FOR NEXT