Bangladesh News Bangladesh News
देश विदेश

Bangladesh News : बांगलादेशात 'हिंदू' टार्गेट, मंदिरांची तोडफोड, पुजाऱ्यांना अटक

Bangladesh News : 4 महिन्यांपूर्वी बांगलादेशात झालेल्या सत्तापालटानंतर देशातील परिस्थिती अधिकच बिकट होतेय. इस्कॉनचे प्रमुख चिन्मय कृष्ण दास यांनाही अटक करण्यात आली.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Bangladesh News : बांगलादेशात गेल्या काही महिन्यांपासून हिंदूंवर सातत्यानं अत्याचार होतायत.. इस्कॉनचे प्रमुख चिन्मय कृष्ण दास यांनाही अटक करण्यात आली. यानंतर याठिकाणी इस्कॉनवर बंदी घालण्याची मागणी जोर धरू लागलीये. बांगलादेशात 4 महिन्यांपूर्वी झालेल्या सत्तापालटानंतर देशातील परिस्थिती अधिकच बिकट होतेय.

शेख हसीना यांचे सरकार पडल्यावर येथील परिस्थिती अधिक बिकट झालीये आणि त्या आपला देश सोडून भारतात आल्या आहेत. बांगलादेशात केवळ इस्कॉन मंदिरावर हल्ला केला जात नाही, तर येथील इतर मंदिरांना देखिल कट्टरपंथी इस्लामिक समूहांकडून लक्ष्य केलं जातयं.. एका रिपोर्टनुसार, बांगलादेशमध्ये सध्या 40 हजार मंदिरे आहेत.

बांगलादेशातील राजकीय अस्थिरतेच्या काळात कट्टरपंथी इस्लामिक समूहांनी इस्कॉनला लक्ष्य केलं होतं..शेख हसीना भारतात आल्यानंतर खुलना विभागातील मेहरपूर येथील इस्कॉन मंदिराची तोडफोड करून आग लावण्यात आली होती. यासह अनेक हिंदू मंदिरांमधील मुर्तींची तोडफोड करण्यात आली होती. बांगलादेशातील नवीन युनूस सरकारवर कट्टरपंथी इस्लामिक समूहांना खूश करण्याचा आणि इस्कॉनवर हल्ला करण्यासाठी परवानगी देण्याचा आरोप आहे. बांगलादेशातील कट्टरपंथी संघटना हिफाजत-ए-इस्लामने शुक्रवारच्या प्रार्थनेनंतर इस्कॉनच्या विरोधात रॅली काढली, ज्यामध्ये निदर्शकांनी इस्कॉनवर बंदी घालण्याची मागणी केली होती.

बांग्लादेशच्या इस्कॉन मंदिर हल्लाच्या घटनेबाबत पुजारी चिन्मय कृष्ण दास यांची सुटका करण्याची मागणी करण्यात आलीय.. तसंच 68 निवृत्त न्यायाधिशासह संसदेतील अधिकाऱ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवेदन पाठवलं आहे.. या निवदेनात बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचाराविरोधात लवकरात लवकर पावलं उचलण्याची मागणी करण्यात आलीय. त्यामुळे खतरे में असलेल्या बांगलादेशातल्या हिंदूंसाठी मोदी काय करतात याकडे सा-या देशाचं लक्ष लागलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मुंबई ते नवी मुंबई विमानतळापर्यंत प्रवास जलद होणार; मेट्रो ८ च्या कामाला वेग, गोल्डन मार्गावर किती स्टेशन असणार?

Maharashtra News Live Update: लातूरमध्ये उष्माघाताचा पहिला बळी

Health warning signs: किडनी आणि लिव्हर खराब झाल्यानंतर शरीरात दिसतात हे बदल; डॉक्टरांनी सांगितली महत्त्वाची माहिती

Pune Summer Tourism: सहलीला जायाचा...! उकाड्यापासून सुटका हवीये? पुण्याजवळची ही 8 थंडगार ठिकाणे पाहाच

Maharashtra Politics: महिला आरक्षण विधेयकाआडून देश तोडण्याचा डाव, उद्धव ठाकरे यांच्याकडून सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल

SCROLL FOR NEXT