Crime Saam
देश विदेश

Shocking News: संबंध ठेवण्यासाठी ५ हजारांची मागणी, स्पर्श करताच बायको द्यायची धमकी, नवरा बिथरला अन्...

Husband wife dispute Karnataka: पत्नी शारीरिक संबंध ठेवण्यासाठी ५ हजार रुपये मागत असल्याचा आरोप पतीने पोलीस ठाण्यात केला आहे. या प्रकरणी पत्नीने देखील पतीवर अनेक आरोप केले आहेत.

Bhagyashree Kamble

कर्नाटकची राजधानी बंगळुरूमधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. पतीने आपल्या पत्नीविरोधात पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पत्नी शारीरिक संबंध ठेवण्यासाठी ५ हजार रुपये मागत असल्याचा आरोप त्याने केला आहे. तसेच स्पर्श करताच पत्नी आत्महत्या करणार असल्याची धमकी देत असल्याचंही त्याने सांगितलं. या प्रकरणी पत्नीने देखील पतीविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, बंगळुरूच्या श्रीकांतने २०२३ मध्ये बिंदुश्रीशी लग्न केले होते. लग्नानंतर दोघांमध्ये वाद सुरू झाले. श्रीकांतने त्याच्या पत्नीविरुद्ध पोलिसात तक्रार दाखल केली. तक्रारीत त्याने म्हटले की, लग्नाला २ वर्ष झाले, तरी देखील पत्नी शारीरिक संबंध ठेऊ देत नाही. बाळासाठी तयार नसल्याचं ती म्हणते.

श्रीकांतने आरोप केला आहे की, त्याची पत्नी त्याच्यासोबत शारीरिक संबंध ठेवण्यास पैसे मागते. तसेच स्पर्श करताच पत्नी आत्महत्या करणार असल्याची धमकी देते. यासह पत्नी बांगड्या किंवा पैंजण घालण्यासही नकार देते. असं पतीने तक्रारीत म्हटलं आहे.

पत्नी बिंदुश्रीनेही पोलीस ठाणे गाठत पती आणि सासरच्या मंडळींविरोधात तक्रार दाखल केली. सासर आणि पती मिळून तिचा छळ करतात असं तिने सांगितलं. तसेच मारहाणही करतात, असंही तिने तक्रारीत म्हटलं. तिने माध्यमांना सांगितले की, तिच्या वडिलांनी तिच्या लग्नात ४५ लाख रुपये खर्च केले. त्यानंतरही, तिचे सासरचे लोक हुंड्यासाठी तिचा छळ करतात. याप्रकरणी दोघांची बाजू ऐकून पोलीस पुढील तपास करीत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Amravati News: अमरावती रुग्णालयातील स्फोटाचा VIDEO समोर, ३ नवजात बाळांचा झाला होता मृत्यू

Maharashtra News Live Update: भारताच्या लोकशाहीवर भाजपने हल्ला केलाय- राहुल गांधी

राज्यसभा निवडणुकीच्या आधी भाजपमध्ये मोठा भूकंप होणार? अनेक नेते बदलणार पक्ष;बड्या नेत्याच्या दाव्यानं खळबळ

तुम्हीही दिवसभर एकाच जागी बसून काम करता? आरोग्यावर होऊ शकतात 5 गंभीर परिणाम; वेळीच घ्या काळजी

Thursday Horoscope: या 3 राशींसाठी आजचा दिवस ठरणार खास; पैशांपासून कामाच्या संधीपर्यंत मिळणार मोठी खुशखबर!

SCROLL FOR NEXT