Longyearbyen Norway
Longyearbyen Norway - Saam Tv
देश विदेश

विचित्र.. या शहरात मृत्यूवर बॅन, गेल्या 70 वर्षांत एकही मृत्यू नाही

वृत्तसंस्था

गात अनेक विचित्र ठिकाणे आहेत. काहींबाबत आपल्या माहिती असते तर काहीबाबत अपण अज्ञानी असतो. या ठिकाणांबाबत माहिती झाल्यावरही त्यावर विश्वास ठेवणे कठीण जाते. असेच एक ठिकाण नॉर्वेमध्ये (Norway) आहे. या ठिकाणाची खास गोष्ट म्हणजे गेल्या 70 वर्षांपासून येथे एकाही व्यक्तीचा मृत्यू झालेला नाही. हे ऐकायला थोडं विचित्र वाटत असलं तरी खरं आहे. चला जाणून घेऊया या ठिकाणाबद्दल - Ban On Death In Longyearbyen Norway Not A Single Person Died In Last 70 Years

लोकांच्या मृत्यूवर प्रशासनाची बंदी

नॉर्वेमध्ये लॉन्गइयरबेन (Longyearbyen) नावाचे एक छोटं शहर आहे. हे शहर स्पिट्सबर्गन बेटावर आहे. या शहराने मृत्यूवर विजय मिळवल्याचे दिसते. कारण, येथील प्रशासनाने लोकांच्या मृत्यूवरच बंदी घातली आहे. जगातील या अनोख्या शहरात गेल्या 70 वर्षात एकाही व्यक्तीचा मृत्यू झाला नसल्याचे सांगितले जाते. पण, त्यामागील कारण जाणून तुम्हाला आश्चर्याचा धक्का नक्की बसेल.

म्हणून मृत्यूवर बॅन

नॉर्वेच्या लॉन्गइयरबेन शहरातील हवामान वर्षभर खूप थंड असते. थंडीच्या (Winter) काळात येथे तापमान (Temprature) इतके कमी होते की माणसाला जगणेही कठीण होते. कुणाचा मृत्यू झाला तरी थंडीमुळे मृतदेह अनेक वर्षे तसाच पडून राहतो. तीव्र थंडीमुळे मृतदेह कुजत नाही. यामुळे मृतदेह नष्ट करण्यासाठी अनेक वर्षे लागतात. त्यामुळे येथील प्रशासनाने माणसांच्या मृत्यूवर बंदी घातली आहे.

हे देखिल पहा-

कडाक्याच्या थंडीमुळे दीर्घकाळ मृतदेहाची विल्हेवाट होत नसल्याने लॉन्गइअरबेन शहर प्रशासनाला अडचणींचा सामना करावा लागत आहे. जर हे मृतहेद शहरात वर्षानुवर्षे असेच पडून राहिले तर या मृतदेहांमुळे शहरात कोणताही धोकादायक आजार पसरु शकतो, त्यामुळे येथे लोकांचा मृत्यू होऊ दिला जात नाही. एखादी व्यक्ती गंभीर आजारी पडली तरी त्याला दुसऱ्या शहरात हलवण्यास सांगितले जाते. त्यानंतर त्याच ठिकाणी मृत्यू झाल्यानंतर त्या व्यक्तीवर अंत्यसंस्कार केले जातात.

शहराची लोकसंख्या सुमारे 2000 आहे. 1917 मध्ये येथे एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता जो इन्फ्लूएंझाने ग्रस्त होता. त्या माणसाचा मृतदेह लॉन्गइयरबेनमध्ये पुरण्यात आला होता. परंतु, त्याच्या शरीरात अजूनही इन्फ्लूएंझा विषाणू आहे. यामुळे शहराला कोणत्याही साथीच्या आजारापासून वाचवता यावे यासाठी प्रशासनाने येथे कोणाचाही मृत्यू न होऊ देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या शहरात लोकांच्या मृत्यूवर बॅन आहे.

Edited By - Noopur Uppal

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

RCB vs CSK IPL 2024: नॉकऑउट सामन्यात आरसीबी २००पार; CSK समोर २१९ धावांचं आव्हान

TVS ची ही बाईक देते 65 Kmpl मायलेज, फक्त लूक नाही फीचर्सही हाय क्लास; जाणून घ्या किंमत

Special Report : फिक्स झालं, जरांगे पाटील आता थेट विधानसभा निवडणुकीच्या मैदानात!

Special Report : भाजप झाला मोठा, संघ झाला मोठा? नड्डांच्या वक्तव्याने भाजपवर सारवासारवची वेळ?

Jayant Patil On Raj Thackeray | लाव रे तो व्हिडीओ दाखवणाऱ्या ठाकरेंची पाटलांनी थेट क्लिपच ऐकवली

SCROLL FOR NEXT