Republic Balochistan saam tv
देश विदेश

पाकिस्तानचे दोन तुकडे झाले? बलुचिस्तानकडून स्वतंत्र देशाची घोषणा; चलनासह राष्ट्रध्वजही बदलला

Republic Balochistan: बलूचिस्तानने पाकिस्तानला मोठा झटका दिलाय. बलूचिस्तान स्वतःला स्वतंत्र देश म्हणून घोषित केलंय. यासोबतच ८५ टक्के भूभागावर आपले नियंत्रण असल्याचा दावाही त्याने केला आहे.

Bharat Jadhav

  • बलुचिस्तानमध्ये बऱ्याच काळापासून तणाव आहे .

  • बलुचिस्तानमध्ये पाकिस्तान सरकारविरोधात घोषणाबाजी

  • बलुचिस्ताननं चलन बदललं, राष्ट्रध्वजही बदलला.

पाकिस्तानला मोठा धक्का देत बलुचिस्तानने स्वतःला स्वतंत्र राष्ट्र म्हणून घोषित केलंय. सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या एका निवेदनानुसार 'रिपब्लिक ऑफ बलुचिस्तान' (बलुचिस्तान प्रजासत्ताक) या नावाने बलुचिस्तानला स्वतंत्र देश म्हणून जाहीर करण्यात आले आहे. एका व्हायरल पत्रात बलूचिस्तानच्या लष्कराने बलूचिस्तानमधील ८५ टक्के भागावर कब्जा केलाय. यासह त्यांनी देशाचा ध्वज, राष्ट्रगीत, नवीन चलन, आणि प्रशासन व्यवस्था लागू करण्यात आल्याचा दावाही करण्यात आलाय.

सोशल मीडियावर शेअर केलेल्या पत्रात असेही नमूद केलंय की, त्या प्रदेशातील खनिज संपत्ती, वायू क्षेत्रे आणि कोळशाच्या खाणींवर नवीन सरकारचं नियंत्रण आहे. यासह पत्रात असंही म्हटलं की, पाकिस्तानच्या सुरक्षा यंत्रणांमधील मोठ्या संख्येने कर्मचाऱ्यांनी राजीनामे देऊन बलुचिस्तानची बाजू स्वीकारली आहे.

पाकिस्तानविरुद्ध वारंवार निदर्शने

बलुचिस्तानमध्ये बऱ्याच काळापासून तणाव आहे आणि पाकिस्तानविरुद्ध अनेकदा निदर्शनेदेखील झाली आहेत. बलुचिस्तानमधील जनता आसिम मुनीर आणि शाहबाज शरीफ यांच्या विरोधातही घोषणाबाजी करत असते. आता बलुचिस्तानने स्वातंत्र्याची घोषणा केल्यामुळे पाकिस्तानची डोकेदुखी आणखी वाढली आहे.

व्हायरल झालेल्या पत्रातील दाव्याला अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. मात्र कोणत्याही प्रमुख आंतरराष्ट्रीय संस्थेने किंवा मान्यताप्राप्त सरकारने बलुचिस्तानला स्वतंत्र देश म्हणून मान्यता दिल्याची घोषणा अद्याप केलेली नाहीये. गेल्या काही महिन्यांत बलुचिस्तानमधील हिंसाचारात वाढ झाली आहे. येथे वांशिक बलुच बंडखोर आणि 'तेहरिक-ए-तालिबान पाकिस्तान' (TTP) चे दहशतवादी सुरक्षा दलांना लक्ष्य करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

देशावर येणार अस्मानी संकट; ऑक्टोबर ते डिसेंबरदरम्यान तीन महाभयानक वादळं धडकणार

Hartalika Vrat Niyam: हरतालिका व्रतात काय खावे आणि काय टाळावे? तुम्हाला माहितीये का?

Weight Gain Reasons: डाएट आणि एक्सरसाइज करूनही वजन वाढतंय? 'या' ७ चुका तुमचा प्रयत्न करू शकतात फेल

Central Railway News : दुष्काळात तेरावा महिना! मेगा ब्लॉक सुटल्यानंतर मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, लोकल सेवा ४५ मिनिटे उशिराने

Maharashtra News Live Update: Mumbai: पुण्यात मराठा बिझनेस कम्युनिटीचा इंटरनॅशनल बिझनेस एक्सपो

SCROLL FOR NEXT