Attack on Pakistan Army Nosheki 90 soldiers Killed Saam Tv News
देश विदेश

मोठी बातमी! पाकिस्तानी सैन्यावर हल्ला, बसची अक्षरश: राख, पुलवामाची पुनरावृत्ती; पाकचे ९० जवान ठार

Attack on Pakistan Army Nosheki 90 soldiers Killed : बलूच आर्मीने प्रत्युत्तर देत पाकिस्तानी कॅम्पवर हल्ला चढवला आहे. या हल्ल्यात बस जळून खाक झाली असून बसमधील ९० जवान ठार झाले आहेत.

Prashant Patil

इस्लामाबाद : आंतरराष्ट्रीय पातळीवरुन एक सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. पाकिस्तानमध्ये बलूच आर्मी आणि पाकिस्तानी सैन्यात घमासान पाहायला मिळत असून बलूच आर्मीने पाकिस्तानची ट्रेन हायजॅक केल्यानंतर पाकिस्तानी सैन्यानेही ठोक भूमिका घेतल्याचं दिसून येत आहे. याचदरम्यान, बलुचिस्तानमध्ये पाकिस्तानी सैन्य दलावर हल्ला करण्यात आला असून बीएलए या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. या हल्ल्यात तब्बल ९० पाकिस्तानी सैन्याचे जवान ठार झाले आहेत, असा दावा बीएलएकडून करण्यात आला आहे.

पाकिस्तान आणि बीएलए यांच्यातील रणसंग्राम अधिक तीव्र झाल्याचं दिसून येत आहे. दरम्यान, बीएलएने पाकिस्तानमधील जाफर एक्सप्रेस हायजॅक केल्यानंतर पाकिस्तानी आर्मीने ऑपरेशन रावबून बलूच आर्मीतील ३० जवानांना ठार करत ट्रेनमधील ओलीस ठेवलेल्या प्रवाशांची सुटका केली होती. त्यानंतर, बलूच आर्मीने प्रत्युत्तर देत पाकिस्तानी कॅम्पवर हल्ला चढवला आहे. या हल्ल्यात बस जळून खाक झाली असून बसमधील ९० जवान ठार झाल्याने पुलवामा हल्ल्याची पुनरावृत्ती झाल्याचं बोललं जात आहे.

द बलुचिस्तान पोस्टच्या वृत्तानुसार, पाकिस्तानी सैन्याच्या कॅम्पवर नोशिकी येथे हल्ला करण्यात आला आहे. आरसीडी हायवेवर पाकिस्तानी सैन्य दलाच्या तुकडीवर बलूच आर्मीकडून हा हल्ला करण्यात आल्याची स्थानिक सूत्रांची माहिती आहे. येथे सुरुवातीला काही स्फोट झाले, त्यानंतर मोठ्या प्रमाणात गोळीबाराची घटना घडली आहे. या हल्ल्यानंतर सुरक्षा रक्षक आणि रुग्णवाहिकांनी घटनास्थळी धाव घेतली असून रुग्णालयातही जमर्जन्सीचा इशारा देण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Wardha Crime: एका हट्टापायी मैत्रीनं घेतला गळ्याचा घोट; खोलीत शिरला अन् तिला संपवून मोबाईल घेऊन पळाला

Voter Scam: हरियाणात 25 लाख व्होट चोरी; राहुल गांधींनी फोडला हायड्रोजन बॉम्ब

High Speed Internet: गावखेड्यात गतीमान इंटरनेट पोहोचणार; इलॉन मस्कच्या स्टारलिंकशी सराकारचा करार

Crime News: प्रियकर इम्रानसोबत प्लॅन आखला, नवऱ्याचे तुकडे करत समीरचा मृतदेह स्वयंपाक घरात पुरला; असा उलगडला हत्याकांड

Solapur : पूरग्रस्त दौऱ्याचा रात्रीस खेळ चाले; केंद्रीय पथक आलं, टॉर्चमध्ये काय पाहिलं? VIDEO

SCROLL FOR NEXT