Tsunami waves crash onto Pacific coasts after Russia’s massive 8.7 earthquake — just as Baba Vanga had predicted for 2025 Saam Tv
देश विदेश

Baba Vanga: खरी ठरली बाबा वेंगाची भविष्यवाणी, भूकंप आणि त्सुनामीचा कहर

Baba Vanga’s Shocking 2025 Forecast Fulfilled: 2025 च्या जुलै आणि ऑगस्ट महिन्याबाबत बाबा वेंगांनी केलेली भविष्यवाणी खरी ठरली आहे. जगात नेमकं काय घडलंय?

Girish Nikam

बल्गेरियन भविष्यवक्त्या बाबा वेंगा यांच्या प्रत्येक भविष्यवाणीकडे जगाचे लक्ष असते. आजवर त्यांनी केलेली प्रत्येक भविष्यवाणी ही खरी ठरली आहे. त्यांनी जुलै आणि ऑगस्ट महिन्यात त्सुनामी तसेच भूकंप येणार असल्याचे म्हटले होते. आता काही देशांमध्ये तशीच परिस्थिती उद्भवल्याचे पाहायला मिळत आहे.

रशियाच्या कामचटका द्वीपकल्पात 30 जुलैला 8.7 रिश्टर स्केलचा भूकंप झाला. प्रशासनाने 1952 नंतरचा सर्वात शक्तिशाली भूकंप म्हटलं आहे. ज्यामुळे जपान आणि अलास्कामध्ये त्सूनामीच्या लाटा उसळल्या. त्याशिवाय रशिया आणि पॅसिफिक बेटांवरही त्सुनामी आली. या भूकंपामुळे कुरिल बेटांवर 4 मीटर उंचीपर्यंत त्सुनामी आली. दुसरीकडे दक्षिण अमेरिकेतही भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. अमेरिकन भुवैज्ञानिक सर्वेक्षण नुसार या भूकंपाची तीव्रता 7.5 इतकी होती. या भूकंपाची खोली 10.8 किलोमीटर होती.

या भूकंपानंतर पॅसिफिक महासागराच्या आसपासच्या लोकांना सतर्क राहण्यास सांगितलय. उत्तर आणि मध्य अमेरिका तसेच न्यूझीलंडमध्येही सतर्कतेचा इशारा देण्यात आला. मात्र या भूकंप आणि त्सुनामीनंतर बल्गेरियन बाबा वेंगा आणि न्यू बाबा वेंगा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जपानी मंगा कलाकार रियो तात्सुकी या दोघांनीही केलेली भविष्यवाणी खरी ठरल्याची चर्चा सुरु झाली. बल्गेरियाचे बाबा वेंगा यांनी 2025-2026 मध्ये भूकंप, पुर यासारख्या नैसर्गिक संकटाचा सामना करावा लागणार.

भीषण भुकंपामुळे महाप्रलयाची सुरुवात होणार असं भाकीत केलं होतं. या भाकीतानुसारच युद्ध, दहशतवादी हल्ले, विमान अपघात, भूकंप अशा कितीतरी जीवितहानीच्या घटना वर्ष संपायच्या आत घडल्या आहेत. त्यामुळे उरलेल्या वर्षात काय होणार याची चिंता काहींना सतावत आहे. मात्र अनेकजण उरलेलं वर्ष शांततेत जाईल, अशा आशेवर आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मनोहर पर्रिकर जसे ट्रॅफिक पाहायला फिरायचे तसे तुम्ही पण फिरा; पुण्यातल्या महिलेचा अजित पवारांना सकाळीच सल्ला

Sanjay Shirsat News : झालं 'कल्याण' ! मंत्री संजय शिरसाट पुन्हा अडचणीत, वाचा स्पेशल रिपोर्ट

Shukra Gochar: दिवाळीनंतर शुक्र ग्रह करणार गोचर; 'या' राशींना बिझनेसमधून मिळणार भरपूर नफा

Akola News : मोबाईल विहिरीत पडला; अकोल्यातील पठ्ठ्याने अख्खी यंत्रणा कामाला लावली, नेमकं काय घडलं? VIDEO

India vs Pakistan : भारत-पाकिस्तानची मॅच दाखवाल तर टीव्ही फोडणार; ठाकरे गटाचा हॉटेल मालकांना इशारा

SCROLL FOR NEXT