CJI Dhananjaya y. chandrachud  Saam Digital
देश विदेश

CJI DY Chandrachud: अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या निकालावर सरन्यायाधीश चंद्रचूड यांची महत्वाची टिप्पणी , म्हणाले..

CJI DY Chandrachud Latest News: 'अयोध्या प्रकरणात सर्वसंमतीने असा निर्णय घेण्यात आला होता की, निर्णय कोणी लिहिला त्याचा उल्लेख होणार नाही, अशी माहिती सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी दिली. (

Vishal Gangurde

CJI DY Chandrachud on Ayodhya Verdict:

सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड यांनी अयोध्येच्या राम मंदिराच्या प्रकरणाच्या निकालावर मोठी टिप्पणी केली आहे. 'अयोध्या प्रकरणात सर्वसंमतीने असा निर्णय घेण्यात आला होता की, निर्णय कोणी लिहिला त्याचा उल्लेख होणार नाही, अशी माहिती सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी दिली. (Latest Marathi News)

सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी पीटीआय वृत्तसंस्थेला मुलाखत दिली. या मुलाखतीत अयोध्या राम मंदिराच्या निर्णयावर टिप्पणी केली. 'या प्रकरणातील दीर्घ इतिहास आणि विविध दृष्टिकोन लक्षात घेऊन सुप्रीम कोर्टाने अयोध्या प्रकरणाचा निर्णय एकमतानं घेतला होता. या प्रकणाराचा निर्णय कोणी लिहिला त्याचा उल्लेख केला जाणार नाही. हा सर्वसंमतीने निर्णय घेतला होता,असे सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी सांगितले. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

अयोध्या प्रकरणावर सुप्रीम कोर्टाने काय निर्णय घेतला होता?

सुप्रीम कोर्टाने ९ नोव्हेंबर २०१९ रोजी अयोध्या राम मंदिर प्रकरणावर निकाल देताना तत्कालीन सरन्यायाधीश रंजन गोगाई यांच्या अध्यक्षतेखाली विशेष खंडपीठाने सर्वांच्या संमतीने निर्णय दिला होता. सूप्रीम कोर्टाने निर्णय देत तीन महिन्याच्या आत मंदिर निर्माण करण्यासाठी ट्रस्ट तयार करण्यास सांगितलं होतं. त्याचबरोबर मंदिर उभारण्याचं नियोजन करून निधी उभारण्याचे निर्देश दिले होते.

या निकालात सुप्रीम कोर्टाने एकूण २.७७ एकर जमीन हिंदू पक्षाला मिळेल. तर या जमिनीचा ताबा कायद्याच्या अधिन राहून संपत्तीच्या सरकारी व्यवस्थापनाकडं राहील. तसेच यावेळी मुस्लिम पक्षाला पर्याय म्हणून पाच एकरची जागा देण्याचा निर्णय देण्यात आला होता.

सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर ५ ऑगस्ट २०२० रोजी राम मंदिर भूमीपूजनाचा कार्यक्रम घेण्यात आला होता. या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी, आरएसएस सरसंघचालक मोहन भागवत, उत्तर प्रदेशचे योगी आदित्यनाथ आणि साधू-संतांनी उपस्थिती दर्शवली होती.

22 जानेवारीला होणार राम मंदिराचा लोकार्पण सोहळा

तत्पूर्वी, राम मंदिराच्या लोकार्पण सोहळा २२ जानेवारी रोजी होणार आहे. या सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही आमंत्रण देण्यात आलं आहे. लोकार्पण सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अयोध्या रेल्वे स्टेशन, महर्षी वाल्मिकी आंतरराष्ट्रीय विमानतळाचं उद्घाटन केलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monday Horoscope : 5 राशींना मिळणार खुशखबर! देवीच्या दर्शनाने दिवस शांततेत जाईल; वाचा सोमवारचे राशीभविष्य

Ratnagiri: काळीज पिळवटून टाकणारी घटना! खाडीत बुडून एकाच कुटुंबातील ४ मुलांचा मृत्यू

पुणे शिक्षक-पदवीधर निवडणुकीसाठी भाजपचा मास्टर प्लॅन; रवींद्र चव्हाण मैदानात!

YouTuber Dhruv Rathee: यूट्युबर ध्रुव राठींची 20 तासांनंतर सुटका; राठींचा पोलिसांवर गंभीर आरोप

Tukaram Mundhe: MPSCच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! आयुक्त तुकाराम मुंढेंवर सरकार सोपवणार नवी जबाबदारी

SCROLL FOR NEXT