Earth News Today Saam Tv
देश विदेश

Earth News Today : पृथ्वीवर आदळणार लघुग्रह, मानवाचं अस्तित्व येणार धोक्यात? 'एपोफिस'वर 'नासा', 'इस्रो'ची नजर

Earth News : पृथ्वीवर लघुग्रह आदळणार असल्याच्या माहितीनं भितीचं वातावरण निर्माण झालंय. मानवी जीवाला किती धोका आहे.

Girish Nikam

पृथ्वीवर लघुग्रह आदळणार असल्याच्या माहितीनं भितीचं वातावरण निर्माण झालंय. मानवी जीवाला किती धोका आहे. यावरुन नासा, इस्त्रोचे शास्त्रज्ञ मंथन करतायेत. नासाच्या अभ्यासात लघुग्रह आदळण्याची वेळ आणि तारीखही समोर आली आहे.

पृथ्वी होणार नष्ट?

अवकाशाच्या जगात अनेकदा लघुग्रहांची चर्चा होत असते. जगातील शास्त्रज्ञांच्या मते सध्या पृथ्वीच्या (earth)सर्वात जवळचा लघुग्रह 'एपोफिस' आहे. हा या काळातील सर्वात धोकादायक लघुग्रह असल्याचे बोलले जात आहे. त्याचा व्यास जवळपास ३७० मीटर आहे. शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार एप्रिल २०२९ आणि २०२६ मध्ये हा धोकादायक लघुग्रह पृथ्वीच्या जवळून जाईल. इस्रो प्रमुखांनी धोकादायक लघुग्रहांचा जगावर होणारा परिणाम आणि त्यापासून बचाव करण्याबाबत माहिती दिली आहे.

इस्रोचे प्रमुख एस. सोमनाथ म्हणाले, आपलं आयुर्मान ७० ते ८० वर्षे आहे. आपल्याला आपल्या आयुष्यात अशा आपत्ती दिसत नाहीत, म्हणून आपण असं मानतो की अशा बाबी शक्य नाहीत. जगाचा आणि विश्वाचा इतिहास पाहिला तर, ग्रहांच्या जवळ येणारे लघुग्रह आणि त्यांच्या प्रभावाच्या घटना वारंवार घडलेल्या आहेत. पृथ्वीवर अशी एखादी घटना (incident)घडली तर आपण सर्व नामशेष होऊ.अशा प्रकारच्या लघुग्रहाच्या धडकेमुळे डायनासोर नामशेष झाल्याचं गृहीत धरण्यात आलं आहे. पृथ्वीचं लघुग्रहांपासून संरक्षण करण्यासाठी जगभरातील अंतराळ संस्था प्रयत्न करत आहेत

सैबेरियातील तुंगुस्का या दुर्गम ठिकाणी एका लघुग्रहामुळे ३० जून १९०८ रोजी भीषण हवाई स्फोट झाला होता. यामुळे सुमारे २,२०० चौरस किलोमीटर क्षेत्रातील घनदाट जंगल नष्ट झालं होतं आणि ८० दशलक्ष झाडं नष्ट झाली होती.

त्यामुळेच 'एपोफिस' लघुग्रहावरुन नासाही चिंतन करीत आहे. नासानं नुकत्याच आयोजीत केलेल्या एका परीषदेत पृथ्वीवरील संभाव्य धोके आणि अंतराळांतील विविध बाबीवर चर्चा करण्यात आली. 'एपोफिस'च्या संकटावर जगभरातील शास्त्रज्ञ एकजूट करुन काय मार्ग काढतात ते पाहणं महत्वाचं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Extramarital Affair : अमेरिकेत पत्नीची हत्या, भारतातील गर्लफ्रेंडला फोटो; उच्चशिक्षित इंजिनिअरचं भयानक कृत्य

Smartphone Care Tips : फोनच्या स्क्रीनवर Liquid Detected चा इशारा येतो? मग टाळा या ७ चुका

Maharashtra News Live Update: पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांच्या ताफ्याला रस्त्यावर पडलेल्या खड्यांचा बसला फटका

शोल्डर बॅग्सच्या 5 लेटेस्ट डिझाईन्स; प्रत्येक आउटफिटला देतील स्टायलिश लूक

आदिवासी महिलेसोबत सामूहिक बलात्कार; नवऱ्याला शोधायला गेली अन् शेतात सापडला मृतदेह

SCROLL FOR NEXT