Election Commission officials addressing media regarding upcoming Assembly Election preparations in five states. Saam Tv
देश विदेश

महत्वाची बातमी! होळीनंतर निवडणुकीचे बिगुल वाजणार; संभाव्य तारखा आल्या समोर

Election Commission Hints Post Holi Election Announcement India: होळीनंतर तामिळनाडू, आसाम, पश्चिम बंगाल, केरळ आणि पुद्दुचेरी विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Omkar Sonawane

तामिळनाडू, आसाम, पश्चिम बंगाल, केरळ आणि पुद्दुचेरी येथे विधानसभा निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांपूर्वी निवडणूक आयोग एकामागून एक राज्यांचा दौरा करत आहे. तामिळनाडू आणि पुद्दुचेरीच्या तीन दिवसांच्या दौऱ्यादरम्यान आयोगाने लवकरच मतदानाच्या तारखा जाहीर करणार असल्याचे सांगितले.

निवडणूक आयोगाने तामिळनाडू आणि पुद्दुचेरीच्या तीन दिवसांच्या दौऱ्याच्या शेवटच्या दिवशी चेन्नई येथे पत्रकार परिषद घेतली. परिषदेदरम्यान आयोगातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की होळीनंतर कधीही निवडणूक वेळापत्रक जाहीर केले जाऊ शकते. आयोगाच्या मते, बऱ्याच राजकीय पक्षांनी एकाच टप्प्यात मतदान घेण्याची विनंती केली आहे. तामिळनाडूतील २३४ विधानसभा जागांपैकी १८८ सर्वसाधारण, ४४ अनुसूचित जातींसाठी आणि दोन अनुसूचित जमातींसाठी राखीव आहेत.

निवडणूक प्रक्रियेदरम्यान ऑनलाइन पसरणाऱ्या पेरलेल्या बातम्या आणि अफवांची त्वरित चौकशी करण्यासाठी आणि त्यांना आळा घालण्यासाठी निवडणूक आयोग लक्ष ठेवून आहे. आयोगाने या संदर्भात राज्यातील संपूर्ण निवडणूक यंत्रणेशी सविस्तर चर्चा केली आहे. निवडणुकीच्या घोषणेनंतर केंद्रीय निरीक्षक येतील आणि जबाबदारी स्वीकारतील, असे निवडणूक आयोगाने सांगितले.

तरुण मतदारांवर विशेष लक्ष

लोकशाहीच्या या उत्सवात तरुण आणि नवीन मतदार उत्साहाने सहभागी व्हावेत असे आवाहन निवडणूक आयोगाने केले आहे. मतदान केंद्रावर जाऊन मतदान करणे आणि सरकार निवडण्यासाठी त्यांचे मोठे योगदान असते. तसेच आयोगाने मतदारांची सोय, मतदान केंद्रांवर रांगेचे व्यवस्थापन आणि निष्पक्ष निवडणुका होण्यासाठी सर्व यंत्रणा सज्ज आहे असे ही निवडणूक आयोगाने सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Actor Death: प्रसिद्ध अभिनेत्याचं अपघातात निधन; वयाच्या ४० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

आता अमेरिका करणार इराणमध्ये सागरी नाकेबंदी, भारतावर मोठा परिणाम होणार

Maharashtra News Live Update: ईडीकडून भोंदू अशोक खरातच्या प्रॉपर्टीची सखोल चौकशी सुरू

बीडमध्ये नेमकं चाललंय काय? मुलासमोरच बापाचा १३ वर्षाच्या मुलीवर बलात्कार

Tea VS Black Coffee: चहा की ब्लॅक कॉफी? सकाळी नेमकं काय पिणं आहे आरोग्यासाठी फायदेशीर; जाणून घ्या

SCROLL FOR NEXT