assam news doctor declared baby dead but baby was found alive before the cremation shocking incident Saam TV
देश विदेश

Shocking News: डॉक्टरांनी मृत घोषित केलेले बाळ अंत्यसंस्कारापूर्वी आढळले जिवंत; चक्रावून टाकणारी घटना

Baby Found Alive Before Cremation: बाळावर अंत्यसंस्कार करण्यासाठी कुटुंबिय स्मशानभूमीत पोहचले असता, बाळ जिवंत असल्याचं त्यांना कळालं.

Satish Daud

Baby Found to Alive Before Cremation

सहा महिन्यांच्या गरोदर असलेल्या महिलेला अचानक प्रसुती कळा सुरू झाल्या. पतीने तिला तातडीने रुग्णालयात दाखल केले. तिथे महिलेने गोंडस बाळाला जन्म दिला. मात्र, बाळाचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी घोषित केलं. इतकंच नाही, तर त्यांचं मृत्यू प्रमाणपत्रही दिलं. दरम्यान, बाळावर अंत्यसंस्कार करण्यासाठी कुटुंबिय स्मशानभूमीत पोहचले असता, बाळ जिवंत असल्याचं त्यांना कळालं. (Latest Marathi News)

यानंतर कुटुंबियांनी तातडीने रुग्णालयातधाव घेत बाळाला पुन्हा उपचारासाठी दाखल केलं. हा धक्कादायक प्रकार आसाममधील (Assam News) सिलचर शहरात घडला आहे. याप्रकरणी बाळाच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी एका खासगी डॉक्टरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सध्या बाळाची प्रकृती स्थिर असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आसाममधील सिलचर शहरात राहणारे रतन दास (वय २९) यांच्या पत्नीला बुधवारी प्रसुती कळा सुरू झाल्या. पत्नी सहा महिन्यांची गरोदर असल्याने त्यांनी तातडीने एका खासगी रुग्णालयात (Hospital) धाव घेतली.

दरम्यान, गर्भधारणेत समस्या असल्याने आई किंवा बाळ यांच्यापैकी आम्ही एकाचाच जीव वाचवू शकतो, असं डॉक्टरांनी रतन दास यांना सांगितलं. यानंतर रतन दास यांच्या परवानगीनंतर डॉक्टरांनी महिलेची प्रसुती केली. यावेळी बाळाचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी घोषित केलं.

इतकंच नाही, तर त्याचं मृत्यू प्रमाणपत्रही दिलं. यानंतर रतन दास यांच्यासह कुटुंबियांनी बाळावर अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी बाळाला घेऊन स्मशानभूमी गाठली. पण तिथे गेल्यानंतर बाळ जिवंत असल्याचं त्यांना कळालं. यानंतर त्यांनी पुन्हा रुग्णालयात धाव घेत बाळाला उपाचारासाठी दाखल केलं.

या संपूर्ण प्रकारानंतर रतन दास यांनी तातडीने पोलिसांत धाव घेत डॉक्टर विरोधात तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून या घटनेचा अधिकचा तपास सुरू केला आहे. सिलचरमधील मालिनीबिल परिसरातील रहिवाशांनी डॉक्टरच्या निष्काळजीपणाबाबत निदर्शने देखील केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

नवी मुंबईत अपघाताचा थरार! धावत्या ट्रेनखाली महिलेने झोकून दिलं; शरीराचे झाले 2 तुकडे

Acid Attack On Minor Girl: सहावीत शिकणाऱ्या मुलीवर ॲसिड हल्ला, अहिल्यानगरमधील संतापजनक घटना

Maharashtra Live News Update: सीसीटीव्हीचा 100% निकाल देणाऱ्या परीक्षा केंद्रांना मोठा दणका

बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध नाही; सुनेत्रा पवारांच्या विरोधात बडा नेता रिंगणात उतरणार

Kairichi Kadhi Recipe : उन्हाळ्यात करा कोकणी मेजवानी; गरमागरम भात अन् कैरीची आंबट-गोड कढी, जणू स्वर्ग सुखच

SCROLL FOR NEXT