Junmoni Rabha Dies In Accident Saam tv
देश विदेश

Junmoni Rabha Dies In Accident: डॅशिंग लेडी सिंघम जुनोमनी राभा यांचा अपघाती मृत्यू; कुटुंबाकडून घातपाताचा संशय व्यक्त

दंबग पोलीस अधिकारी, लेडी सिंघम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पोलीस उपनिरीक्षक जुनोमनी राभा यांचं अपघाती निधन झालं आहे.

Vishal Gangurde

Junmoni Rabha News: दंबग पोलीस अधिकारी, लेडी सिंघम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आसाममधील पोलीस उपनिरीक्षक जुनोमनी राभा यांचं अपघाती निधन झालं आहे. त्यांची कार एका कंटेनर ट्रकला धडकली. या अपघातात जुनोमनींचा मृत्यू झाला आहे. जुनोमनी राभा यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबाने घातपाताचा संशय व्यक्त केला आहे. (Latest Marathi News)

जुनोमनी राभा यांची कारकिर्द अनेक कारणामुळे वादग्रस्त ठरली. राभा यांना भ्रष्टाचाराच्या एका प्रकरणात अटक देखील झाली होती. राभा यांच्या विरोधात एक दिवस आधी एफआयआर दाखल झाला होता.

सरुभुगिया गावात झाला अपघात

जुनोमनी राभा या खासगी कारमधून वर्दवीवर नसताना प्रवास करत होत्या. त्यावेळी राभा यांचा अपघात झाला. हा अपघात आक जाखलाबंधा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील सरुभुगिया गावात झाला आहे .

डॉक्टरांनी केलं मृत घोषित

पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं की, जुनोमनी राभा या मोरीकोलोंग पोलीस स्टेशनच्या प्रभारी होत्या. जुनोमनी या गुन्हेगारांच्या विरोधात नेहमी आक्रमक असायच्या. जाखलबांधा पोलीस स्टेशनच्या प्रभारी पवन कलिता यांनी सांगितले की, उशिरा रात्री अडीच वाजता अपघाताची सूचना मिळाल्यानंतर आमचं पथक अपघातस्थळी पोहोचलं. त्यानंतर जूनमोनी राभा यांना रुग्णालयात दाखल आले. रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टारांनी त्यांना मृत घोषित केले.

कुटुंबाचा घातपाताचा संशय

जुनमोनी राभा यांच्या कुटुंबांनी या अपघातामागे घातपाताचा संशय व्यक्त केला आहे . जुनमोनी राभा यांच्या अपघाताचा तपास करण्याची मागणी केली आहे. जूनमोनी यांच्या आईने आरोप केला की, 'एका अज्ञात रॅकेटने पूर्वनियोजित हत्या केल्याचा आरोप केला आहे'.

जुनोमनींची वादग्रस्त कारकिर्द

पोलीस उप निरीक्षक जुनोमनी राभा यांची कारकिर्द तशी वादग्रस्तच राहिली. त्यांनी आधीचा प्रियकर आणि होणाऱ्या नवऱ्याला भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली अटक केली होती. या प्रकरणानंतर जुनोमनी यांनाही भ्रष्टाचाराच्या प्रकरणात अटक करण्यात आली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Rain Live News: खडकवासल्यातून पाण्याचा विसर्ग; पुण्यातील टिळक पूल वाहतुकीसाठी बंद

Parliament: अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल, लोकसभेत नेमकं काय घडलं?

Online Gaming Ban Bill : ऑनलाइन गेम खेळणं बंद होणार? केंद्राचं विधेयक, ऑनलाईन गेम 'ओव्हर'

BEST Election: ठाकरे बंधूंच्या हाती भोपळा, BMC च्या लिटमस टेस्टमध्ये ठाकरे फेल

Brain Health: तल्लख बुद्धी हवी? तर मेंदूच्या आरोग्यासाठी आजच सोडा 'या' वाईट सवयी

SCROLL FOR NEXT