Assam Kaziranga Accident: 24 Killed, 20 Injured In Traveller-truck Collision 
देश विदेश

Assam Kaziranga Accident: डोळ्यांच्या पापण्या लवते न लवते तोच अनर्थ घडला! भरधाव ट्रॅव्हलर थेट कंटेनर ट्रकवर आदळला; २४ जणांचा मृत्यू

Assam Kaziranga Accident: आसाममधील काझीरंगा राष्ट्रीय उद्यानाजवळ एका ट्रॅव्हलर व्हॅन आणि कंटेनर ट्रकच्या धडकेत २४ जण ठार, तर २० जण जखमी झाले आहेत. या अपघाताचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Bharat Jadhav

  • आसाममधील काझीरंगा राष्ट्रीय उद्यानाजवळ भीषण रस्ते अपघात.

  • ट्रॅव्हलर व्हॅन आणि कंटेनर ट्रकची जोरदार धडक.

  • या दुर्घटनेत २४ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती.

आसाममधील काझीरंगा राष्ट्रीय उद्यानाजवळ एक भीषण अपघात झाला असून या दुर्घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. दोन सेकंदांच्या या व्हिडिओ क्लिपमध्ये, एक पांढरी 'टेम्पो ट्रॅव्हलर' वाहन अतिशय वेगाने येताना दिसतेय. पुढे एक ट्रक उभा असलेला दिसून येतो. पुढच्याच क्षणी 'टेम्पो ट्रॅव्हलर' थेट ट्रकवर जाऊन आदळताना दिसतोय.

गोलाघाट जिल्ह्यातील रंगाजान भागात या अपघातात २४ जणांचा मृत्यू झालाय. तर २० जण जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि बचाव पथके घटनास्थळी पोहोचली. जखमींना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी, आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासह अनेक नेत्यांनी या घटनेबद्दल दुःख व्यक्त केलंय. राज्याचे मुख्यमंत्री शनिवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास घटनास्थळी भेट देणार आहेत. काझीरंगा येथे झालेल्या रस्ते अपघाताबाबत मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा म्हणाले, "मी उद्या काझीरंगाला भेट देणार आहे. ही घटना कशी आणि का घडली, याची चौकशी सरकारतर्फे केली जाईल.

अवघ्या दोन सेकंदात घडला भीषण अपघात

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका व्हिडिओमध्ये, एक पांढरी 'ट्रॅव्हलर' व्हॅन अतिशय वेगाने पुढे जाताना दिसते. समोर एक कंटेनर ट्रक येतो आणि काही क्षणांतच व्हॅनची त्या ट्रकशी जोरदार धडक होते. ही संपूर्ण घटना अवघ्या दोन सेकंदात घडली. धडक होताच व्हिडिओमध्ये एक प्रखर प्रकाश चमकताना दिसतोय. ही संपूर्ण घटना डोळ्यांचे पाते लवते न लवते तोच ही दुर्घटना घडली.

अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, अपघातात मृत्यूमुखी पडलेल्यांमध्ये दोन महिलांचाही समावेश आहे. बळी पडलेल्यांपैकी अनेकजण महाविद्यालयीन विद्यार्थी होते, जे वर्ग संपल्यानंतर घरी परतत होते. वाहनातील बहुतेक प्रवासी तरुण असल्याचे सांगण्यात येत आहे. या अपघातात २० जण जखमी झालेत. पोलीस आणि बचाव पथकांनी घटनास्थळी पोहोचून मदत व बचाव कार्य सुरू केले आहे. जखमींना जवळच्या रुग्णालयांत दाखल करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Saturday Horoscope: या 3 राशींना मिळणार आनंदाची बातमी, तर काहींनी पैशांच्या बाबतीत राहावं सावध!

छठ पूजेविरोधात ठाकरे मैदानात; 'यूपी निवडणुकीसाठी छठ पूजेच्या वादाचा घाट

संजय शिरसाटांच्या घरावर बाटलीफेक; पोलीस प्रशासनाच्या कारभारवर शिरसाट संतप्त

Union Cabinet Expansion: काही मंत्र्यांना डच्चू, मित्रपक्षांना संधी? केंद्रीय मंत्रिमंडळात मोठ्या बदलांचे संकेत, राजकीय घडामोडींना वेग

Winter Travel : ५ हजारांच्या बजेटमध्ये भारतात मिळेल मिनी स्वित्झर्लंडचा अनुभव, गुलाबी थंडीत 'या' ५ ठिकाणी एकदा भेट द्याच

SCROLL FOR NEXT