Assam Crime News  Google
देश विदेश

Student Attack on Teacher : अभ्यास केला नाही म्हणून शिक्षक ओरडले, विद्यार्थ्याने भर वर्गातच चाकूने भोसकलं; खळबळजनक घटना

Student Killed Teacher By Stabbing In classroom: आसाममध्ये एका विद्यार्थ्याने शिक्षकाची वर्गातच हत्या केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे शाळेत मोठी खळबळ उडाली आहे.

Rohini Gudaghe

आसाममधील शिवसागर जिल्ह्यातील एका खासगी शाळेत काल ६ जूलै रोजी ११ वीच्या विद्यार्थ्याने शिक्षकाची चाकूने भोसकून हत्या केलीय. वर्गातच हा धक्कादायक प्रकार घडल्याचं समोर आलंय. राजेश बाबू बिजवाडा असं मृत शिक्षकाचं नाव आहे. ते विज्ञान शिक्षक असून संस्थेचे व्यवस्थापक असल्याची माहिती देखील समोर आली आहे.

शाळेत दहशतीचं वातावरण

शिक्षकाची हत्या करणाऱ्या या सोळा वर्षीय विद्यार्थ्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. त्याची सध्या चौकशी करण्यात (Assam Crime News) येतेय. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या शिक्षकाने आरोपी विद्यार्थ्याला त्याच्या अभ्यासावरून फटकारलं होतं. पालकांना शाळेत घेवून येण्यास सांगितलं होतं. याचाच राग मनात धरून या विद्यार्थ्याने शिक्षकावर प्राणघातक हल्ला केल्याची घटना (Crime News) घडली.

शिक्षकावर चाकूने प्राणघातक हल्ला

हा विद्यार्थी साध्या कपड्यांमध्ये शाळते आला होता. शिक्षकांनी त्याला परत जाण्यास सांगितलं, तेव्हा अचानक त्याने बिजवाडा यांच्यावर चाकूने प्राणघातक हल्ला (Student Killed Teacher) केला. या हल्ल्यामध्ये राजेश बाबू बिजवाडा गंभीर जखमी झाले होते. चाकूहल्ल्यानंतर ते जमिनीवर कोसळल होते. मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाला होता. त्यांना तातडीने रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. परंतु रूग्णालयात नेत असतानाच त्यांचा मृत्यू झाल्याचं त्यांच्या सहकारी शिक्षकांनी सांगितलं आहे.

आरोपी पोलिसांच्या ताब्यात

विद्यार्थी चाकू घेवून शाळेत आला होता, याची कल्पना नसल्याची माहिती देखील शाळेतील इतर शिक्षकांनी दिली (Student Killed Teacher By Stabbing) आहे. गुन्हा केल्यानंतर विद्यार्थी शाळेतच होता. मृत राजेश बाबू यांची पत्नीही त्याच शाळेत काम करत असल्याची माहिती पोलिसांनी दिलीय. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून तपास करून विद्यार्थ्याला ताब्यात घेऊन शिवसागर सदर पोलीस ठाण्यात नेलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Train Accident: भीषण रेल्वे अपघात, ट्रेनच्या धडकेत ५ जणांचा मृत्यू

विनोद कांबळीची तब्येत पुन्हा बिघडली; ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका, मदतीसाठी सचिनसह जुने मित्र मदतीला धावले

Maharashtra News Live Update: धाराशिवमधील पार्डीत टायरच्या दुकानाला भीषण आग

Crime: विमान प्रवासात महिलेवर बलात्कार, भारतीय नागरिकाला अटक

महाराष्ट्राच्या प्रशासनात पुन्हा उलटफेर; 5 बड्या अधिकाऱ्यांच्या बदल्या, कुणाची कुठे बदली?

SCROLL FOR NEXT