Aasam Railway Accident News  AI Image
देश विदेश

Railway Accident : भीषण! धावत्या एक्स्प्रेसचे ५ डबे रुळावरून घसरले; ५० प्रवासी जखमी

Assam Kolkata-Sairang Express Train Accident : आसामच्या कामरूप जिल्ह्यात कोलकाता-सैरंग एक्सप्रेसचा मोठा अपघात. डिगारू स्थानकाजवळ इंजिन आणि पाच डबे रुळावरून घसरले. सुमारे ५० प्रवासी जखमी.

Alisha Khedekar

  • आसामच्या कामरूप जिल्ह्यातील डिगारू रेल्वे स्थानकाजवळ कोलकाता-सैरंग एक्सप्रेसचा अपघात

  • ट्रेनचे इंजिन आणि पाच डबे रुळावरून खाली उतरले

  • अपघातात सुमारे ५० प्रवासी जखमी

आसाममधील कामरूप जिल्ह्यात बुधवारी सकाळी रेल्वेचा मोठा अपघात झाला. डिगारू रेल्वे स्थानकाजवळ कोलकाता-सैरंग एक्सप्रेसचे इंजिन आणि पाच डबे रुळावरून घसरले. या अपघातात सुमारे ५० प्रवासी जखमी झाल्याची माहिती आहे. याप्रकरणी पोलीस पुढील कारवाई करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी सकाळी ६ वाजून ५४ मिनिटांच्या सुमारास हा अपघात घडला. कोलकाता-सैरंग एक्सप्रेस (१३१२५) ही ट्रेन डिगारू रेल्वे स्थानकावरून दुसऱ्या रुळावर वळवली जात होती. याच वेळी ट्रेनचा वेग कमी न झाल्याने ती दुसऱ्या रुळावर लावण्यात आलेल्या बॅरिकेड्सला धडकली. या धडकेमुळे ट्रेनचे इंजिन आणि पाच डबे रुळावरून खाली उतरले.

पूर्वोत्तर सीमांत रेल्वेच्या माहितीनुसार, दुसऱ्या ट्रेनला आधी मार्ग देण्याची प्रक्रिया सुरू असताना हा प्रकार घडला. दरम्यान, या अपघाताशी संबंधित एक ४५ सेकंदांचा व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये ट्रेनच्या इंजिनमधील लोको पायलटच्या केबिनचे दृश्य दिसत आहे. त्यामध्ये कंट्रोल पॅनल, डिजिटल स्क्रीन, विविध स्विच आणि इतर उपकरणे पाहायला मिळतात.

व्हिडिओमध्ये लोको पायलटचा आवाजही ऐकू येत आहे. इंजिनमधील कोणतीही यंत्रणा व्यवस्थित काम करत नसल्याचे ते सांगत आहेत. सिग्नलमध्ये बिघाड झाला असून इमर्जन्सी यंत्रणाही काम करत नसल्याचे त्यांच्या बोलण्यातून ऐकायला मिळते. तसेच एस९ आणि ए९ यंत्रणाही बंद असल्याचे ते सांगत आहेत.

अपघाताची माहिती मिळताच रेल्वेचे अधिकारी, कर्मचारी आणि बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी डब्यांमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढले. जखमी प्रवाशांना तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले. तसेच प्रवाशांचा पुढील प्रवास खोळंबू नये यासाठी रेल्वे प्रशासनाने दुसऱ्या ट्रेनची व्यवस्था केली आहे. या अपघातामुळे रेल्वे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून अपघाताच्या नेमक्या कारणांचा तपास केला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पालघरमध्ये नरभक्षक बिबट्या अखेर जेरबंद; वनविभागाला मोठं यश

NCP Merger: सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादीचे २०-२२ आमदार फुटणार, बड्या नेत्याच्या दाव्याने राजकारणात खळबळ

वास्तुशास्त्रानुसार घरात झाडू कुठे ठेवावा आणि कुठे ठेवू नये?

IVF Treatment: IVF उपचार म्हणजे वेदना आणि जुळ्या मुलांचा जन्म? उपचारांबाबतचे हे 5 गैरसमज आधी दूर करा, डॉक्टरांनी सांगितलं महत्त्वाचं सत्य!

Hair Care : तुम्ही दिवसभर केस घट्ट बांधून ठेवताय? सावधान! केसांचे अन् मेंदूचे होतेय मोठे नुकसान; वेळीच सोडा सवय, नाहीतर...

SCROLL FOR NEXT