Punjab polls: Channi requests PM Modi to order probe into separatism allegations against Kejriwal Saam Tv
देश विदेश

Punjab: "...तर मी खलिस्तानचा पंतप्रधान बनेल" केजरीवालांच्या तथाकथित वक्तव्याच्या चौकशीसाठी CM चन्नी यांचं PM मोदींना पत्र

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

चंदिगढ: पंजाब राज्यात येत्या २० फेब्रुवारीला विधानसभा निवडणुकासाठी मतदान पार पडत आहे. अशात पंजाबमध्ये राजकारण चांगलचं तापलंय. यंदाच्या पंजाब विधानसभा निवडणुकीत आम आदमी पार्टी हा पक्षदेखील आपल्या संपुर्ण ताकदीनं निवडणुक (Punjab Election 2022) लढतोय. अशातच आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांच्यावर त्यांचे पुर्व सहकारी कुमार विश्वास (Kumar Vishwas) यांनी गंभीर आरोप केले आहेत. "मला एकतर पंजाबचा मुख्यमंत्री व्हायचंय किंवा खलिस्तानचा पंतप्रधान" असं वक्तव्य अरविंद केजरीवाल यांनी केलं असल्याचा दावा कुमार विश्वास यांनी केला. (‘Arvind Kejriwal wanted to be either Punjab’s CM or Khalistan’s PM’: ex-AAP leader Kumar) कुमार विश्वास यांच्या या दाव्यात किती सत्यता आहे याची चौकशी करण्याची मागणी पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी (Charanjit Singh Channi) यांनी पंतप्रधान मोदींकडे (PM Modi) केली आहे.

हे देखील पहा -

कुमार विश्वास हे पेशाने कवी आहेत. ते कधीकाळी अरविंद केजरीवाल यांच्या सर्वात जवळचे सहकारी होते, अरविंद केजरीवाल मुख्यमंत्री झाल्यावर त्यांच्यात आणि कुमार विश्वास यांच्यात अनेक मतभेद झाले आणि ते वेगळे झाले. एका हिंदी वृत्तसंस्थेशी बोलताना कुमार विश्वास यांनी दावा केला की, केजरीवाल मला म्हणाले होते - "मी एकतर पंजाबचा मुख्यमंत्रा बनेल किंवा खलिस्तानचा पंतप्रधान" असा गंभीर आरोप त्यांना केजरीवालांवर केला आहे, तसेच केजरीवालांना कुठल्याही परिस्थितीत पंजाबची सत्ता हवी आहे असाही दावा कुमार विश्वास यांनी केला.

याबाबत पंजाबचे विद्यमान मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी यांनी प्तप्रधांनाना पत्र लिहिलं की, "मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विनंती करतो की, कुमार विश्वास यांनी अलीकडे जे म्हटले आहे त्याची निष्पक्ष चौकशी करावी. राजकारण बाजूला ठेवा, पंजाबच्या जनतेने फुटीरतावादाशी लढताना मोठी किंमत मोजली आहे. पंतप्रधानांनी प्रत्येक पंजाबीची चिंता दूर करणे आवश्यक आहे."

काय आहे खलिस्तान?

१९७० व ८० च्या दशकात पंजाबात शीखांचे स्वतंत्र देश अस्तित्वात यावा यासाठी चळवळ चालू झाली होती. ह्या काल्पनिक स्वतंत्र देशाचे नाव खलिस्तान असे पंजाबी भाषेतील खालसा (पवित्र) या शब्दावरून ठेवण्यात आले होते. (खालिस्तान = पवित्र भूमी). शीखांच्या या मागणीला या काळात दहशतवाद व हिंसाचाराचे स्वरूप प्राप्त झाले. या चळवळीने भारत सरकारशी एक प्रकारचे युद्ध उभे ठाकले होते. भारताच्या पंतप्रधान इंदिरा गांधी, पंजाबचे मुख्यमंत्री बेअंत सिंग, जनरल अरुण श्रीधर वैद्य अश्या अनेक महत्त्वाच्या व्यक्ती या दहशतवादाला बळी पडल्या. १९८६-८७ च्या सुमारास पंजाब पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर या खलिस्तानी दहशतवाद्यांविरुद्ध कारावाई केली व त्यामुळे ही चळवळ व त्याच्या संबधित दहशतवादाला आळा बसला. सध्या ही चळवळ यूके, कॅनडा इत्यादी देशात रहाणाऱ्या शीख समुदायापुरती व सांस्कृतिक चळवळ यांपुरती मर्यादित आहे. भारतात या चळवळीचे अतिशय क्रूर रूप पहावयास मिळाल्याने कोणत्याही प्रकारच्या ऊग्र खलिस्तानी चळवळीवर जगात बंदी आहे.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना प्रत्येक महिन्याला मिळणार 3000 रुपये? CM शिंदे यांनी केलं मोठं वक्तव्य; वाचा...

IND-W vs PAK-W: You Miss I Hit..! पहिलीच ओव्हर अन् रेणुकाच्या In Swinger वर फेरोजाची दांडी गुल

Marathi News Live Updates : पुण्यात भरधाव वेगात असलेल्या डंपरने घेतला तरुणीचा जीव

Trend Shoes In India: शूजच्या या टॉप ब्रँडनी भारतीयांना घातलेय भूरळ, सध्या खूपच आहेत ट्रेंडिंगमध्ये

Ajit Pawar : भाऊबीजेची ओवाळणी मिळेल, पण लाडक्या भावाला विसरू नका; अजित पवार असं का म्हणाले?

SCROLL FOR NEXT