Arvind Kejriwal Saam Tv
देश विदेश

Gujarat Election 2022: 'आप'चा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण असेल? अरविंद केजरीवाल करणार घोषणा

पंजाब मध्ये वापरलेला पॅटर्न गुजरात मध्ये यशस्वी ठरणार का?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

शिवाजी काळे

Gujarat Assembly Election 2022 : संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या गुजरात विधानसभा निवडणुकांचा अखेर बिगुल वाजला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने (Election Commission) पत्रकारपरिषद घेऊन गुजरात विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. गुजरात विधानसभेसाठी दोन टप्प्यात मतदान (Voting) होणार आहे. पहिल्या टप्प्यासाठी येत्या १ आणि दुसऱ्या टप्प्यासाठी ५ डिसेंबर रोजी मतदान होणार असून ८ डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. 

आत्तापर्यंत गुजरात विधानसभा निवडणूकीत भाजप (BJP) आणि काँग्रेसमध्ये (Congress) सामना होत आला आहे. मात्र, यंदाच्या निवडणूकीत गुजरातमध्ये पहिल्यांदाच आम आदमी (AAP) पक्षही मैदानात उतरला आहे. आज आम आदमी पक्ष मुख्यमंत्री पदाचा उमेदवार जाहीर करणार आहे. या संदर्भात दिल्लीचे मुख्यमंत्री आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांनी मोबाईल क्रमांक देऊन लोकांच्या प्रतिक्रिया मागवल्या आहेत. त्यामुळं आज केजरीवाल मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून कोणाच्या नावाची घोषणा करतात हे पाहणं महत्त्वाचे आहे.

केजरीवाल यांनी पंजाब विधानसभा निवडणुकीत अशाच प्रकारे नागरिकांच्या प्रतिक्रिया घेऊन भगवंत मान यांना मुख्यमंत्री पदाचा उमेदवार घोषित केलं होतं. त्यात ते यशस्वी ठरले होते. त्यामुळं पंजाब मध्ये वापरलेला पॅटर्न गुजरात मध्ये यशस्वी ठरणार का? असा सवाल उपस्थित होत आहे. गुजरातमध्ये १९९५ पासून भाजपची सत्ता आहे.

गुजरात विधानसभा निवडणूक वेळापत्रक

पहिल्या टप्प्यासाठी 5 नोव्हेंबरला अधिसूचना जारी होणार

दुसऱ्या टप्प्यासाठी 10 नोव्हेंबरला अधिसूचना जारी होणार

अर्ज छाननी

पहिला टप्पा: 15 नोव्हेंबर

दुसरा टप्पा:18 नोव्हेंबर

अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख

पहिला टप्पा: 17 नोव्हेंबर

दुसरा टप्पा: 21 नोव्हेंबर

किती टप्प्यात पार पडणार मतदान: दोन टप्प्यात निवडणूक

पहिला टप्पा: 1 डिसेंबर

दुसरा टप्पा: 5 डिसेंबर

मतमोजणीची तारीख: 8 डिसेंबर

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fig Water for Weight Loss: वजन कमी करण्यासाठी बदाम-अक्रोडऐवजी सकाळी प्या अंजीरचं पाणी; शरीराला होतील भरपूर फायदे

Maharashtra News Live Update: लातूरमध्ये मराठा आंदोलकांचं पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन सुरू

Ration Card Free Ration: रेशन कार्डधारकांसाठी खुशखबर! २५ सप्टेंबरदरम्यान साखर फक्त १८ रुपये किलो, मोफत गहू-तांदूळ मिळणार

Eknath Shinde : शिंदेसेनेला मोठा धक्का! ठाण्यातील नगरसेविका सुलेखा चव्हाण यांचे पद रद्द

Bigg Boss 20 : 'बिग बॉस २०'च्या घरात कोणाची सत्ता चालणार? 'हा' सदस्य ठरला पहिला कॅप्टन, गेममध्ये नवा ट्विस्ट

SCROLL FOR NEXT