Arvind Kejriwal Rouse Avenue Court ANI
देश विदेश

Arvind Kejriwal: मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना न्यायालयाचा दणका; वाढला तुरुंगातला मुक्काम

Arvind Kejriwal Delhi Liquor Scam Case: मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या जामीन अर्जावर आज राऊस एव्हेन्यू कोर्टात सुनावणी झाली. कोर्टाने त्यांच्या कोठडीत ३ जुलैपर्यंत वाढ केलीय. केजरीवाल हे दिल्लीतील दारू घोटाळ्याच्या प्रकरणात तुरुंगात आहेत.

Bharat Jadhav

दिल्ली दारू घोटाळा प्रकरणी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या नियमित जामीन याचिकेवर राऊस एव्हेन्यू कोर्टात सुनावणी झाली. या सुनावणीत अरविंद केजरीवाल यांना न्यायालयाने दणका दिलाय. दिल्लीच्या राऊस ॲव्हेन्यू कोर्टाने केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत ३ जुलैपर्यंत वाढ केलीय. केजरीवाल यांना तिहार तुरुंगातच राहावे लागणार आहे.

विशेष न्यायाधीश न्याय विंदू यांच्या न्यायालयात आजची सुनावणी झाली. ईडीच्या वतीने एएसजी एसव्ही राजू आणि केजरीवाल यांचे वकील विक्रम चौधरी न्यायालयात उपस्थित होते. दोघांनीही आपापल्या बाजूने युक्तिवाद केला. केजरीवाल यांच्या अटकेला आणि रिमांडला आव्हान देणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने आपला निर्णय राखून ठेवला असल्याचे विक्रम चौधरी यांनी न्यायालयाला सांगितलं. सर्वोच्च न्यायालयाने कनिष्ठ न्यायालयात जामीन याचिका दाखल करण्यास परवानगी दिल्याची माहिती विक्रम चौधरी यांनी दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sleep Problems: तुमची झोप नीट होत नाहीये? रोजच्या या ५ सवयींमुळं उद्ध्वस्त होतेय रात्रीची विश्रांती

Green Tea vs Black Tea vs Lemongrass Tea: ग्रीन टी, लेमनग्रास टी की ब्लॅक टी? तुमच्या आरोग्यासाठी बेस्ट चहा कोणता?

Hot Chocolate Recipe: लहान मुलांसाठी झटपट बनवा झटपट टेस्टी हॉट चॉकलेट, वाचा सोपी रेसिपी

Maharashtra News Live Update: दादर-शिवाजी पार्क परिसरात CJP आंदोलकांवर पोलिसांची कारवाई

Navratri 2026 Date: नवरात्री 10 की 11 ऑक्टोबरला सुरू? तारीख नक्की जाणून घ्या

SCROLL FOR NEXT