Apple Saam Tv
देश विदेश

Appleच्या इंजिनिअरने दिला थेट राजीनामा, कारण जाणून आश्चर्य वाटेल!

जगाच्या काही शहरांमध्ये कोविड केसेसमध्ये घट झाल्यामुळे दोन वर्षांपासून अधिक काळ बंद असलेली कार्यालये पुन्हा सुरू झाली आहेत.

वृत्तसंस्था

जगाच्या काही शहरांमध्ये कोविड केसेसमध्ये घट झाल्यामुळे दोन वर्षांपासून अधिक काळ बंद असलेली कार्यालये पुन्हा सुरू झाली आहेत. कार्यालयात परत बोलावल्यानंतर अनेकांनी नोकरीचा राजीनामा दिला. बरेच लोक पुन्हा ऑफिसमधून काम करण्यास उत्सुक आहेत, मात्र काही जणांनी ऑफिसमधून काम करण्यासाठी विरोधही दर्शवला आहे. कारण विरोध करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे की, यामुळे प्रवासासह इतर गोष्टींवर खूप वेळ जातो आणि पैसेही वाया जातात.

Apple कंपनीचे मशीन लर्निंगचे संचालक, इयान गुडफेलो (Ian Goodfellow) यांनाही कदाचित असेच वाटले असावे आणि त्यांना कार्यालयात परत येण्यास जेव्हा सांगितले तेव्हा त्यांनी चक्क अ‍ॅपलमधील इंजिनिअर नोकरीचा राजीनामा दिला! (Apple Engineer Left Job)

Zoe Schiffer यांनी ट्विटद्वारे माहिती दिली

झो शिफरच्या म्हणण्यानुसार, इयानने आपल्या टीम सदस्यांना कंपनी सोडण्याच्या निर्णयाबद्दल माहिती दिली. झो यांनी ट्विट केले की, "अ‍ॅपलचे मशीन लर्निंगचे संचालक, इयान गुडफेलो, कामावर परतण्याच्या पॉलिसीमुळे ते कंपनी सोडत आहेत. कर्मचार्‍यांना दिलेल्या नोटमध्ये त्यांनी म्हटले आहे की, "माझ्या टीमसाठी कामातील अधिक लवचिकता सर्वात महत्त्वाची आहे यावर माझा विश्वास आहे."

हे देखील पाहा-

नवीन वर्क पॉलिसीनुसार कर्मचाऱ्यांनी 11 एप्रिलपर्यंत आठवड्यातून किमान एक दिवस, 2 मे पासून आठवड्यातून किमान दोन दिवस आणि 23 मे पासून आठवड्यातून किमान तीन दिवस काम करावे लागेल. Apple ने आपल्या कर्मचाऱ्यांना 23 मे पासून आठवड्यातून किमान तीन दिवस कार्यालयात परतण्यास सांगितले आहे. मात्र, काही कर्मचारी अॅपलच्या या नव्या पॉलिसीवर खुश नाहीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Local: प्रवासी लोकलखाली आल्याने पश्चिम रेल्वेचे वाहतूक विस्कळीत; पाहा VIDEO

Trisha Krishnan: त्रिशा कृष्णनची राजकारणात एन्ट्री? पोटनिवडणूक लढवण्याची शक्यता

नंदूरबारमध्ये अग्नितांडव! नवापूर MIDC मध्ये कंपनीला भीषण आग, एकापोठापाठ ५ स्फोटामुळे परिसर हादरला

Maharashtra News Live Update: नालासोपारात गटारावरील जाळीत महिलेचा पाय अडकला

Kasara-Manmad Railway: पाच तालुके अन् ४५ गावातून धावणार कसारा-मनमाड रेल्वे; नाशिक-मुंबई प्रवास होणार जलद

SCROLL FOR NEXT