Nagpur Earthquake Saam Digital
देश विदेश

Jammu Kashmir Earthquake : जम्मू-काश्मीरच्या बारामुल्लामध्ये भूकंपाचे धक्के; भल्यापहाटे जमीन हादरली, पाहा VIDEO

Earthquake in Jammu Kashmir : जम्मू-काश्मीरमध्ये आज मंगळवारी पहाटेच्या सुमारास भूकंपाचे सलग दोन धक्के जाणवले. अचानक जमीन हादरल्याने गाढ झोपेत असलेले लोक घाबरून घराबाहेर पडले.

Satish Daud

जम्मू-काश्मीरमध्ये आज मंगळवारी पहाटेच्या सुमारास भूकंपाचे सलग दोन धक्के जाणवले. अचानक जमीन हादरल्याने गाढ झोपेत असलेले लोक घाबरून घराबाहेर पडले. रिश्टर स्केलवर पहिल्या भूकंपाची तीव्रता 4.9 तर दुसऱ्या भूकंपाची तीव्रता 4.6 इतकी होती. भूकंपामुळे कोणतीही जीवित किंवा मालमत्तेची हानी झालेली नाही, असं नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीकडून सांगण्यात आलं आहे.

मागील काही महिन्यांपासून जम्मू-काश्मीरला सातत्याने भूकंपाचे धक्के बसत आहेत. त्यामुळे येथील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय. मंगळवारी पहाटे सहा वाजेच्या सुमारास जम्मू-काश्मीरमधील बालमुला, पुंछ आणि श्रीनगरसह काश्मीर खोऱ्यात भूकंपाचे धक्के जाणवले.

अचानक जमीन हादरल्याने गाढ झोपेत असलेले लोक खडबडून जागे झाले. यावेळी काहींच्या घरातील भांड्यांची पडझड देखील झाली. सुदैवाने या अपघातात कुठलीही जीवित आणि वित्तहानी झाली नसल्याचं वृत्त आहे. दुसरीकडे पाकिस्तानातही भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले आहेत.

पाकिस्तानकडून अद्याप कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही. जम्मू-काश्मीरला बसलेल्या भूकंपाच्या धक्क्यांचे काही व्हिडीओ देखील समोर आले आहेत. ज्यामध्ये भूकंपामुळे पंखा वेगाने थरथरत असल्याचे दिसून येत आहे. जम्मू-काश्मीरमध्ये महिनाभरातील हा दुसरा भूकंप आहे. यापूर्वी १२ जुलै रोजी बारामुल्लामध्ये ४.१ तीव्रतेचा भूकंप जाणवला होता.

भूकंपाचे धक्के इतके जोरदार होते की घरांचे पंखे थरथरू लागले. लोकांनी आपल्या कपाटात ठेवलेल्या वस्तूही हलताना दिसल्या. जम्मू-काश्मीरमधील पुंछ येथून एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये भूकंपामुळे पंखा वेगाने थरथरत असल्याचे दिसून येत आहे. जम्मू-काश्मीरमध्ये महिनाभरातील हा दुसरा भूकंप आहे. यापूर्वी १२ जुलै रोजी बारामुल्लामध्ये ४.१ तीव्रतेचा भूकंप जाणवला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PBKS vs MI: तिलक वर्माची तुफानी खेळी, ६ विकेट राखत मुंबईचा विजय; पंजाबचा सलग पाचवा पराभव

Pollution: हवेतील प्रदूषण होणार कमी; 'शेवाळ' गिळणार कार्बन डायऑक्साईड

दोन दिवस वर्क फ्रॉम होम; मंत्र्यांचे परदेश दौरे रद्द, नवीन वाहन खरेदीवर बंदी; सरकारचे मोठे निर्णय

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींच्या खात्यावर पैसे जमा होण्यास सुरुवात, पण ७० लाख महिलांचा हप्ता झाला बंद, कारण आलं समोर

लसीकरणानंतर चिमुकलीचा मृत्यू; आजोबा रात्रभर मृतदेह घेऊन बसले, आरोग्य यंत्रणेचा संतापजनक प्रकार

SCROLL FOR NEXT