Anna Hajare, Arvind kejriwal  Saam Tv
देश विदेश

'तुमच्या बोलण्यात आणि वागण्यात फरक'; मद्य धोरणावर अण्णा हजारेंचे अरविंद केजरीवालांना पत्र

साम वृत्तसंथा

अहमदनगर: गेल्या काही दिवसापासून दिल्लीतील (Delhi) मद्य धोरणावरुन आम आदमी पक्ष चर्चेत आला आहे. या प्रकरणी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना सीबीआयने ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी आता सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना पत्र लिहिले आहे.

या पत्रात अण्णा हजारे यांनी दारू धोरणावर अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांच्यावर नाराजी व्यक्त केली आहे. 'तुमच्या सरकारने महिलांवर परिणाम करणारे मद्य धोरण लागू केले, लोकांचे जीवन उद्ध्वस्त केले. तुमच्या बोलण्यात आणि वागण्यात फरक आहे, असं अण्णा हजारेंनी पत्रात म्हटले आहे.

'टीम अण्णाच्या सदस्यांची १० वर्षांपूर्वी १८ सप्टेंबर २०१२ रोजी दिल्लीत (Delhi) बैठक झाली. त्यावेळी तुम्ही राजकीय मार्ग स्वीकारण्याबाबत बोलला होता. पण राजकीय पक्ष काढणे हे आपल्या आंदोलनाचे उद्दिष्ट नव्हते हे तुम्ही विसरलात. त्यावेळी जनतेच्या मनात टीम अण्णांबद्दल एक विश्वास निर्माण झाला होता. म्हणूनच टीम अण्णाने देशभर फिरून लोकशिक्षण, जनजागृतीचे काम करणे गरजेचे आहे, असे मला त्यावेळी वाटले. या दिशेने काम झाले असते, तर मद्यबाबत असे चुकीचे धोरण कुठेही केले नसते, असंही अण्णा हजारेंनी पत्रात म्हटले आहे.

'सरकार कोणत्याही पक्षाचे असो, सरकारला जनहिताचे काम करण्यास भाग पाडण्यासाठी समविचारी लोकांचा दबावगट असणे गरजेचे होते. तसे झाले असते तर देशात परिस्थिती वेगळी असती आणि गरिबांना फायदा झाला असता. पण दुर्दैवाने तसे झाले नाही. त्यानंतर आप, मनीष सुसोदिया आणि अन्य सहकाऱ्यांनी मिळून पक्ष स्थापन केला. ऐतिहासिक चळवळ उद्ध्वस्त करून स्थापन झालेला पक्षही इतर पक्षांच्या वाटेवर जाऊ लागला. हे अत्यंत दुःखद आहे, असंही अण्णांनी पुढे म्हटले आहे.

भ्रष्टाचारमुक्त भारतासाठी ऐतिहासिक आणि लोकनियुक्त आंदोलन. त्यात लाखो लोक आले होते. त्यावेळी तुम्ही लोकायुक्तांची गरज असल्याबद्दल मंचावरून मोठमोठी भाषणे दिली होती. आदर्शच्या मनात राजकारण आणि व्यवस्थेचे विचार होते. पण दिल्लीचे मुख्यमंत्री झाल्यानंतर तुम्ही लोकपाल आणि लोकायुक्त कायदा विसरलात. तुमच्या सरकारने महिलांवर परिणाम करणारे, लोकांचे जीवन उद्ध्वस्त करणारे मद्य धोरण लागू केले. यावरून तुमच्या बोलण्यात आणि वागण्यात तफावत असल्याचे दिसून येत आहे, असं अण्णा हजारेंनी (Anna Hajare) पत्रात म्हटले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dombivli Politics : मंत्र्यांच्या वाढदिवसाच्या दिवशीच विरोधात बॅनरबाजी, प्रकरण थेट पोलिसांत पोहोचलं

Mumbai Crime : पार्किंगवरून भांडण, महिलेकडून विनयभंगाच्या गुन्ह्याची धमकी; भीतीपोटी वृद्धाने संपवले आयुष्य

Special Story: हमास, हिजबोल्ला एकवटले, इस्त्राईलला घेरले; मोसाद विरूद्ध मुस्लिम संघर्षाची इनसाईड स्टोरी

Jitada Fish : चविष्ट 'जिताडा' समुद्रातून होतोय गायब, मच्छिमारांच्या हातीही लागेना; काय आहे कारण? पाहा व्हिडिओ

Maharashtra News Live Updates : वडीगोद्रीत मराठा आणि ओबीसी आंदोलक आमनेसामने, घटनास्थळी पोलीस तैनात

SCROLL FOR NEXT