Anju Nasrullah News Saam Tv
देश विदेश

Anju Nasrullah News : पाकिस्तानात जाऊन अंजूचं नशिब फळफळलं?, सोमवारी पत्रकार परिषद घेऊन करु शकते मोठी मागणी

Anju Nasrullah Pakistan : सोशल मीडियावर अंजू आणि नसरुल्ला यांचा एक व्हिडिओ समोर आला आहे.

साम टिव्ही ब्युरो

Pakistan News : राजस्थानातून पाकिस्तानात गेलेली अंजू सध्या चांगलीच चर्चे आहे. अंजू मित्र नसरुल्लाला भेटायला गेली होती. मिळालेल्या माहितीनुसार, दोन मुलांची आई असलेल्या अंजूने इस्लाम धर्म स्वीकारला आहे. २५ जुलै रोजी तिने मित्र नसरुल्लासोबत निकाह केल्याची माहिती आहे. आता आणखी एक नवीन माहिती समोर येत आहे की, अंजूला २४ तासांत सुमारे १.२५ कोटींचे गिफ्ट्स मिळाले आहेत.

सोशल मीडियावर अंजू आणि नसरुल्ला यांचा एक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये हे जोडपे एका रिअल इस्टेट कंपनीच्या चीफ ऑपरेटिंग ऑफिसरसोबत दिसत आहेत. व्हिडीओमध्ये, पाकिस्तानी स्टार ग्रुप ऑफ कंपनीजचे सीईओ मोहसीन खान अब्बासी या जोडप्याला का भेटले. त्यांनी नसरुल्ला आणि अंजू यांना एका निवासी भूखंड, 50,000 पाकिस्तानी रुपये रोख आणि इतर मौल्यवान वस्तू भेट म्हणून दिल्या. भारतीय पत्रकार रविंदर सिंग रॉबिन यांनी हा व्हिडिओ ट्विटरवर पोस्ट केला होता.

उद्या पत्रकार परिषद घेण्याची शक्यता

मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तानच्या पाच कंपन्यांनी अंजूला नोकरीच्या ऑफर दिल्या आहेत. याशिवाय अंजू आणि नसरुल्ला सोमवारी, ३१ जुलै रोजी पत्रकार परिषदही घेऊ शकतात. अंजू यावेळी पाकिस्तानच्या नागरिकत्वाची मागणी करू शकते. यासोबतच ती पाकिस्तान सरकारकडे तिचे मुलं भारतातून आणण्याची मागणी करू शकते, अशी माहिती एबीपी न्यूजने दिली आहे. (Latest Marathi News)

पाकिस्तानचे षडयंत्र?

एकीकडे असं बोललं जात असताना, दुसरीकडे अंजूचा वापर पाकिस्तान भारताविरोधात अपप्रचार करण्यासाठी करू शकतो. तसेच अंजूचा फोन आयएसआयकडे आहे. तसेच अंजूसोबत दोन सुरक्षा कर्मचारी सतत दिसत आहेत. त्यामुळे पाकिस्तान या सगळ्याचा देखावा तर करत नाहीये ना असा संशयही उपस्थित होत आहे.(Political News)

अंजू झाली फातिमा

भारतातून पाकिस्तानात गेलेल्या अंजूने इस्लाम धर्म स्वीकारला असून तिचे नाव फातिमा झाले आहे. ग्वाल्हेर येथील रहिवासी असलेल्या अंजूचे लग्न अरविंदसोबत झाले होते. दोघेही राजस्थानमध्ये राहत होते. अंजू आणि अरविंद यांना १५ वर्षांची मुलगी आणि सहा वर्षांचा मुलगा आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Festive Car Sales: सणासुदीच्या काळात 'या' ब्रँडच्या गाड्यांचा विक्रमी रेकॉर्ड; ४ लाखांहून अधिक गाड्या विकल्या, वाचा संपूर्ण माहिती

Maharashtra Live News Update: कार्यकर्त्यांवर होणाऱ्या संभाव्य खोट्या गुन्ह्यांना उत्तर देण्यासाठी जनशक्ती शेतकरी संघटनेच्या नेत्याची 'अनोखी शक्कल'

Kuchipudi Dance History: 'या' गावाच्या नावावरून कुचीपुडी नृत्याचे नाव पडले, जाणून घ्या त्याचा इतिहास

Raj-Uddhav Thackeray: ठाकरे बंधू पुन्हा एकत्र, भाऊबीज साजरी करण्यासाठी जयजयवंती यांच्या घरी पोहचले; पाहा VIDEO

Parineeti Chopra Birthday: राघव चढ्ढा आणि परिणीती चोप्रा कोण जास्त श्रीमंत? जाणून घ्या अभिनेत्रीची नेटवर्थ

SCROLL FOR NEXT